मुंबई

नवी मुंबई विमानतळ नामकरण वादात

CD

भिवंडी, ता. २७ (वार्ताहर) : नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचे आग्रह असूनही, या मुद्द्यावर राजकीय वाद सुरू झाला आहे. विमानतळाचे नामकरण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार सकारात्मक होते; पण काही विरोधक श्रेयवादासाठी आटापिटा करत आहेत, अशी टीका माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली.

दोन हजार चारचाकी वाहनांची कार रॅली काढून नाव देता आले असते, तर मी १२ हजार कार रॅली काढेल, असा टोला कपिल पाटील यांनी लगावला. त्यांनी लोकसभेत २०१५मध्ये ही मागणी प्रथम केल्याची आठवण करून दिली. दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून अनेक आंदोलनांनी मागणी पुढे नेली. भूमिपुत्रांच्या आग्रहानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला निर्णय मागे घेऊन दि. बा. पाटील यांचे नाव देणे भाग पडले. त्यानंतर नामकरणाची प्रक्रिया सुरू झाली. कपिल पाटील यांनी स्पष्ट केले की, हे नामकरण सर्व प्रयत्नांचे यश आहे आणि त्याचे श्रेय कोणी एकट्याने घेऊ नये. जो कोणी प्रयत्न करतो त्याचे अभिनंदन करावे; पण काहींना राजकारण करण्याची घाई असते त्यांना त्यांचे लखलाभ मिळतात, अशी खोचक टीका पाटील यांनी केली.


थातूरमातूर कारण सांगणे बंद करा : सुरेश म्हात्रे
नवी मुंबई विमानतळाचे नामकरणासंबंधी कपिल पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार सुरेश म्हात्रे यांनी २०१५ पासून कोणाला कोणते पत्र दिले, कोणते आंदोलन केले, याबाबत कपिल पाटील यांनी थातूरमातूर कारण सांगणे बंद करावे, असा टोला लगावला आहे. लोकसभेत आवाज उठवला म्हणजे पुरेसे नाही. त्यांनीही आवाज उठवला, पत्रव्यवहार केला आणि ४ जूनच्या रॅलीत सहभागी झाले, जिथे हे कोणीही नव्हते. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवून कार रॅली काढली. फक्त पत्र देऊन गप्प बसणे हे पाठपुरावा नाही. नामकरणासाठी कोणता आदेश काढला आहे, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. कृती समितीवर त्यांचा विरोध नाह; पण माहिती व पारदर्शकता आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Video : चारित्र्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्यांना रूपाली चाकणकरांचं कडक शब्दांत उत्तर; जाणून घ्या, काय म्हणाल्या?

Ajit Pawar : अतिवृष्टीचा विचार करून आगामी गळीत हंगाम शुभारंभाचा निर्णय घेणार

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Vani Crime : पतीच्या त्रासामुळे माहेरी आलेल्या पत्नीस पतीनेच कातरीने वार करीत केली हत्या

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT