मुंबई

अनधिकृत बांधकामप्रकरणी चौकशीचे आदेश

CD

अनधिकृत बांधकामप्रकरणी चौकशीचे आदेश
३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करा; न्यायालयाचे बाजार समितीला निर्देश

कल्याण, ता. २९ (वार्ताहर) ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. माजी संचालक मयूर पाटील यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत पणन महामंडळाच्या संचालकांना चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

याचिकाकर्ते मयूर पाटील यांच्या वतीने वकील भरतकुमार नुकते यांनी न्यायालयात बाजू मांडली. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने बाजार समितीच्या संचालक मंडळावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पाटील यांच्या तक्रारीनुसार, आरक्षित असलेल्या शेतकरी शेडच्या जागेवर अटी-शर्तींचा भंग करून व्यापारी गाळे बांधण्याचा निर्णय बहुमताच्या जोरावर घेतला गेला; मात्र आरक्षण बदलण्याची कोणतीही अधिकृत परवानगी शासनाकडून घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने एपीएमसी मार्केट प्रशासनाला विचारले, की आरक्षण बदलण्याची परवानगी शासन वा पणन महामंडळाकडून घेतली आहे का? यावर संबंधित अधिकाऱ्यांनी अशा परवानगीचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे कबूल केले. या पार्श्वभूमीवर, पणन महामंडळाच्या संचालकांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मयूर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की न्यायालयावर पूर्ण विश्वास असून, दोषींवर कारवाई निश्चित होईल. गरज भासल्यास माजी सभापती व संचालक मंडळातील संबंधित व्यक्तींना तुरुंगवासदेखील होऊ शकतो.

महत्त्वाचे मुद्दे
शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदा बांधकामाचा आरोप
शासनाची परवानगी न घेता व्यापारी गाळे बांधण्याचा निर्णय
उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT