मुंबई

तंत्रमंत्रच्या नादात ३ कोटींचा चुना

CD

तंत्रमंत्राच्या नादात तीन कोटींचा चुना
मौलवीकडून विशेष पूजेच्या नावाखाली फसवणूक
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : तंत्रमंत्रातून करणी काढण्याच्या बहाण्याने एका मौलवीने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका तरुणाकडून तब्बल तीन कोटी १० लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दारावे गावातील तेजस घोडेकर (२२) याची आई भारती घोडेकर नऊ वर्षांपासून आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे. तेजसने अनेक रुग्णालयांमध्ये उपचार करून पाहिले; मात्र काहीही उपयोग झाला नाही. २०१९ मध्ये सीवूड्स-दारावे गावातील दर्ग्याविषयी त्याला माहिती मिळाली होती. वडिलांसोबत त्याने मौलवी मुस्तफा शेख ऊर्फ कांबळेची भेट घेतली होती. मुस्तफाची मुलगी सफीनाने तेजसला आईवर करणी केल्याचे सांगत ५० हजार रुपये घेतले. नंतर तिचा भाऊ आहात शेखने संपर्क साधत तंत्रविद्येतून आई बरी होईल, असे सांगून विश्वास संपादन केला. काश्मीर विशेष पूजाविधीसाठी तब्बल तीन कोटी १० लाख खर्च केले, पण आईच्या प्रकृतीत फरक पडला नसल्याने तेजसने डिसेंबर २०२४ मध्ये पैसे परत मागितले. त्या वेळी आहात शेखने १९ लाख रुपये परत केले; मात्र उर्वरित रक्कम मागितल्यावर तेजससह त्याच्या कुटुंबाला करणी करून ठार मारू, अशी धमकी दिली होती.
--------------------------
सहा जणांविरोधात गुन्हा
नेरूळ पोलिसांनी मौलाना मुस्तफा शेख ऊर्फ कांबळे, त्याचा मुलगा आहात शेख, मुलगी सफीना नानू शेख, जावई नानू शेख, वसीम शेख, वडील रफिक शेख यांच्याविरोधात फसवणूक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Crime विहिरीच्या पाण्याचा वाद, पुतण्यानं काकाला शेतात संपवलं, नंतर काकूची दारवाजातच हत्या

Sugarcane Crop Fire: डीपीच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक; साडेचार लाखांचे नुकसान, बेलगाव येथील शेतकऱ्याला आर्थिक फटका

रताळ्याचा वडापाव खाल्लाय का? डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितली चविष्ट अन् हेल्दी रेसिपी

Success Story: पतीचा दुबईत अभियांत्रिकीचा ठसा, पत्नीची परदेशात तंत्रज्ञान क्षेत्रात झेप; कांडगे दाम्पत्याची प्रेरणादायी यशोगाथा

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके! १४ गावे, ९ वाड्या-वस्त्यांना २१ टँकरचा आधार

SCROLL FOR NEXT