मुंबई

वोट चोरी रोखण्यासाठी वसईत काँग्रेस तर्फे सह्यांची मोहीम

CD

वोटचोरीविरोधात काँग्रेसतर्फे सह्यांची मोहीम
विरार (बातमीदार) ः कर्नाटकातील माधवपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे वोटचोरी प्रकरण जनतेसमोर आणले. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या लढाईच्या अनुषंगाने देशभरात सर्वत्र सह्यांची मोहीम राबवली जात आहे. यानुसार वसई रोड रेल्वेस्थानक, एसटी स्थानक येथे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम घेतली. यामध्ये वसई विधानसभेचे उमेदवार विजय पाटील यांनी स्वतः स्वाक्षरी करून सुरुवात केली. माणिकपूर ब्लॉक काँग्रेसच्या पुढाकाराने व जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या नेतृत्वात या मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी ब्लॉक अध्यक्ष विल्फ्रेड डिसोजा, जिल्हा व ब्लॉग पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वोटचोरी करून राज्यात निवडून आलेल्या महायुती सरकारचे पानिपत करणार असल्याचे ओनील आल्मेडा यांनी सांगितले. एकट्या नवघर माणिकपूर विभागात हजारो मतं बोगस असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या वेळी वसई विधानसभा मतदारसंघातसुद्धा वोटचोरी होत आहे. याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि महायुतीचा बुरखा फाडणार असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच द्या - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT