मुंबई

भरधाव कंटेनरने दोघांना चिरडले

CD

भरधाव कंटेनरने दोघांना चिरडले
अंबरनाथमध्ये एमआयडीसी रस्त्यावर भीषण अपघात; एक जखमी

अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) ः अंबरनाथजवळील आनंदनगर एमआयडीसी रस्त्यावर रविवारी (ता. २८) सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या तीन तरुणांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
वैभव सुनील जाधव, सत्यम बिंद आणि श्याम राजभर हे तीन तरुण दुचाकीवरून रविवारी सकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना अंबरनाथ पूर्व येथील पलेगाव डीमार्टसमोर एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडकेत सत्यम आणि श्याम यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर कंटेनरचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. सत्यम आणि श्याम हे दोघे वसार गावचे रहिवासी असून त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचं आव्हान श्याम मानव यांनी स्वीकारलं; पण 'या' मुद्द्यावरुन एकमत होईना

Shaktipith Highway : ​‘शक्तिपीठ’ महामार्गाचा धनदांडग्यांनाच फायदा, शेतकऱ्यांचे मात्र 'पीठ' होणार; नव्या आरेखनाविरोधात शेतकरी आक्रमक

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

Electricity Bill Saving Tips : हवं तेवढं वापरा फॅन, एसी, फ्रीज! पण वीजबिल येणार निम्मं; वापरुन पाहा 'ही' एकदम सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT