मुंबई

कौटुंबिक वादातून पत्नीवर भाजी कापण्याच्या चाकुने वार करुन निघृण हत्या

CD

कौटुंबिक वादातून पत्नीची चाकूने वार करून निर्घृण हत्या

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) ः सीवूड्समधील करावे गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून पत्नीवर भाजी कापण्याच्या चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी (ता. २८) सायंकाळी घडली. राजू बिसन काकडे (वय ४५) आरोपीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ज्योती राजू काकडे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून ती करावे गावातील साईवाडी येथील शिवशंभू इमारतीमध्ये पती व दोन मुलांसह राहत होती. आरोपी राजू हा अधूनमधून बांधकाम क्षेत्रात (सेंट्रिंग) काम करत होता. तसेच तो पुणे येथे राहत असल्यामुळे तो ज्योतीला पुणे येथे घेऊन गेला होता. राजूला मद्याचे व्यसन असल्याने कामावर जात नव्हता. त्यामुळे या दाम्पत्यामध्ये वाद होत होते. तसेच तो ज्योतीला त्रास देत होता. दारूसाठी तो ज्योतीकडे पैशांसाठी तगादा लावत होता. या त्रासाला कंटाळून २०२३मध्ये ज्योती तिच्या दोन्ही मुलांसह करावे गाव येथे राहण्यासाठी आली होती. त्यानंतर ती घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. गेल्या १५ दिवसांपासून राजू हा ज्योतीकडे राहण्यासाठी आला होता. येथेही त्याने मद्याच्या नशेत ज्योतीला मारहाण सुरू केली होती.
दरम्यान, ज्योती रविवारी नेहमीप्रमाणे घरकाम करून सायंकाळी सहा वाजता घरी परतली. या वेळीही दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून राजूने रागाच्या भरात भाजी कापण्याच्या चाकूने ज्योतीचे हात, पोट, छाती, मांडी आणि पायावर गंभीररीत्या वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला शेजाऱ्यांनी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी राजूला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: रचिन रवींद्रचा भारी कॅच केएल राहुलने घेतला, तर कॉनवेचा अडथळाही दूर झाला! भारत विजयाच्या उंबरठ्यावर, पण...

IND A vs PAK A: तिलक वर्माचं शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी व्यर्थ! हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा भारतावर ४८ धावांनी विजय

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

SCROLL FOR NEXT