फुल बाजार ‘सोन्या’ने सजले
दसरा महागला!
पावसामुळे फुलांची आवक घटलीः भाव वाढले
ठाणे, ता. ३० (बातमीदार) : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्ताच्या निमित्ताने फुल बाजारात नागरिक गर्दी करत आहेत. ठाण्यातील स्थानक परिसर, जांभळी नाका आणि मुख्य बाजारपेठ ही फुलांनी व सोन्याने म्हणजेच आपट्याच्या हिरव्या पानांनी सजली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आवक कमी झाली असून, फुलांच्या किमती वाढल्या आहेत.
बाजारात पिवळा, भगवा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. ८० ते १५० रुपये किलो भावाने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. देवीच्या पूजेसाठी वापरली जाणारी शेवंती १०० ते २०० रुपये किलो आहे. यासह अस्टर, मोगरा, जाई, जुई, चाफा, गुलछडी, गुलाब, सोनचाफा, जरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे. यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार १०० रुपये, तोरण ५० ते १०० रुपये, पूजेसाठी लागणारे बेल पान, तुळस, दुर्वा १० ते २० रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहे.
दसऱ्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून वाडा, येऊर, भिवंडी, कर्जत, पानखंड आदी भागातील आदिवासी फुलविक्रेते मोठ्या संख्येने ठाण्याच्या बाजारपेठेत दाखल झाले. दरम्यान, आदिवासी फुलविक्रेत्यांनी दसऱ्याला लागणारे नवसाचे तोरण, भाताच्या लाह्या, आंब्याच्या टाळा, आपट्याच्या पानांची जोडी, जांभळी फुले, करडू अशा विविध वस्तू बाजारात आणल्या आहेत, मात्र मुसळधार पावसाने महागाई वाढत असून, त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याचे आदिवासी विक्रेत्यांनी सांगितले.
ठाणे बाजारपेठेतील फुलांचे भाव :
• पिवळा झेंडू - ७० रु. अर्धा किलो
• भगवा झेंडू - ७० रु. अर्धा किलो
• आपट्याची पाने - १० ते २० रु. जुडी
• करडू फुले - १० ते २० रु. जुडी
• आंब्याची पाने- २० ते ३० रु. जुडी
• भाताच्या लाह्या - १० ते २० रु. जुडी
• गुलाब - २०रु. जुडी
• कमळ - २० नग
• पिवळा अष्टर - ८० ते १०० रु. अर्धा किलो
• जांभळी अष्टर - १०० रु. अर्धा किलो
• गजरा - २० रु. एक
• वेणी - ४० रु. एक
• सुटते गुलाब - १०० रु. किलो
• नामधारी गोंडा - ८० रु. अर्धा किलो
• फुलांचा हार - ८० ते २०० रु.
• पिवळी शेवंती - १०० ते २० रु. किलो
• पांढरी शेवंती - १०० ते २०० रु. किलो
• ऑर्किड - ३० ते ४० एक काडी
• नवसावाचे तोरण - ५० ते १०० रु. किलो
वीस ते पन्नास टक्क्यांची वाढ
दरम्यान, पावसामुळे फुलांची आवक कमी झाली असून, काही ठिकाणी माल खराब होत आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांची आवक जास्त प्रमाणात होत असते, मात्र पावसामुळे या फुलांचे नुकसान झाले असून बाजारात आवक घटली आहे. परिणामी, फुलांच्या दरात वीस ते पन्नास टक्क्यांची वाढ झाली असल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.
‘या’ वस्तूंवर आमचा उदरनिर्वाह
आपट्याची पाने, भाताचे तुरे, बोंड्याची फुले, तुरे, आंब्याची टाळे गोळा करण्यासाठी दोन-तीन दिवसांची मेहनत असते. आमचे सगळे कुटुंब जंगलात फिरून हे सगळ गोळा करतात. पावसाळी भाजा आणि दसऱ्याला लागणाऱ्या वस्तूंवर आमचा उदरनिर्वाह चालतो. आता या वस्तू स्वस्त आहेत, मात्र दसऱ्याच्या दिवशी याचे भाव वाढू शकत असल्याचे आदिवासी महिला मनीषा पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.