मुंबई

पथनाटयातून स्वच्छतेचा जागर

CD

पथनाटयातून स्वच्छतेचा जागर
वाशी, ता.१ (बातमीदार) ः स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत लोकसहभागातून विविध उपक्रम राबवितानाच कचरा वर्गीकरण व त्याची विल्हेवाट या विषयीही व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये पथनाटयासारख्या अत्यंत लोकप्रिय कलाप्रकाराचा उपयोग करुन स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. संध्याकाळच्या वेळेत स्टेशन, मॉल, मार्केट, वर्दळीच्या जागा अशा ठिकठिकाणी पथनाटयाचे दररोज ४ ते ५ प्रयोग होत असून आरंभ इंटरटेनमेंट संस्थेचे कलावंत प्रभावी सादरीकरण करीत पथनाटयाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश सर्वत्र प्रसारीत करीत आहेत.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबविला जात असून यामध्ये ओला, सुका,घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण घरापासूनच करावे हे अभिनव नाटयातून सादर करण्यात येत आहे. याकरिता बाहुबली या जनमाणसांना आवडलेल्या चित्रपटातील कटप्पा आणि अमरेंद्र बाहुबली या दोन पात्रांच्या माध्यमातून नवी मुंबईत स्वच्छतेला दिले जाणारे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. नवी मुंबईने कचरामुक्त शहराचे सेव्हन स्टार मानांकन प्राप्त केले असून सातत्याने देशात पहिल्या तीन क्रमांकात राहिल्याने नवी मुंबई आता स्पेशल सुपर स्वच्छ लीग कॅटेगरीमधील सुपर स्वच्छ शहर झाले असल्याचे या पथनाटयातून सांगण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे गावाकडून नवी मुंबईत मुलाकडे आलेल्या आजीला कचऱ्यासाठी दोन वेगवेगळे डबे घरात ठेवणे व स्वच्छतेचे नियम याची माहिती हसत खेळत देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करुन कापडी पिशव्यांचा वापर करण्यासही प्राधान्य देण्याचा संदेश नाटय रुपात देण्यात आलेला आहे. स्वच्छ शहराचा बहुमान मिळालेल्या नवी मुंबई शहराचा जबाबदार नागरिक म्हणून शहर स्वच्छतेत आपले योगदान देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असा संदेश देत पथनाटयास उपस्थित प्रेक्षक नागरिकांसमवेत स्वच्छतेची शपथ घेऊन या पथनाटयाची सांगता होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५०० कोटींचं प्रकरण केंद्राकडे? मोदींना पत्र, शिंदेंच्या नेत्यांकडून फडणवीसांची भेट! जरांगेंनी उघड केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ९ जण कोण?

Satara News: जलमंदिर पॅलेसवर रवींद्र चव्हाण यांचे स्वागत; उदयनराजेंकडून शिवरायांचे शिल्प देऊन सत्कार

China Earthquake : तिबेट नंतर आता चीन, पाकिस्तान अन् अफगाणिस्तानही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; बचावकार्य तातडीने सुरू, बर्फवृष्टीचे संकट

Marathi News Live Updates : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, विवेकानंदनगरमधील महापालिका हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची लगबग

Jaywant Sugar: ‘जयवंत शुगर’समोरील वजन काटा पाडला बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसदर जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT