मुंबई

डहाणू सागरी महामार्गासाठी २५२ कोटींची मंजुरी

CD

डहाणू, ता. १ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सागरी महामार्गअंतर्गत झाई, बोर्डी, तारापूर, राज्यमार्गावरील डहाणू पारनाका ते बोईसर पास्थळनाक्यापर्यंत २३ किमी आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालय ते पारगाव पोलिस चौकीपर्यंतच्या ३३ किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २५२ कोटी ७७ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तिला कोकण सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाने २६ जुलै २०२२ रोजी १९६ कोटी ३६ लाखांची स्थापत्य कामे करण्यासाठी तांत्रिक मान्यता दिली होती.

सागरी महामार्ग अंतर्गत येणाऱ्या कामात २७ किमी नवीन रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. यातील २३ किमी रस्त्याचे नूतनीकरण, तर पाच किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या रस्त्याची रुंदी सात ते १२ मीटरच्या दरम्यान असणार आहे. या रस्त्यावर ६८ मोऱ्या, चार स्लॅबकन्वर्ट, पाच लहान पूलांचे बांधकाम, दोन मोठ्या पुलांची दुरुस्ती, ६१ चौकांची सुधारणा, तसेच १५ बस स्थानकांचा समावेश आहे. या सागरी महामार्गाचे काम धुळे जिल्ह्यातील एस. बी. देशमुख कंपनीला देऊन १८४ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली आहे. तसेच या रस्त्याचे काम सुरू करण्याचा कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. त्यामुळे या सागरी महामार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पोपटराव चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

IND vs NZ T20 : भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकणार

SCROLL FOR NEXT