मुंबई

पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर

CD

पालघर, ता. १ (बातमीदार) : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण शासन नियम व तरतुदीनुसार निश्चित करण्यात आले आहे. त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या आरक्षणानुसार पालघर पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. वसई, मोखाडा, डहाणू आणि विक्रमगड पंचायत समित्यांची सभापती पदे अनुसूचित जमाती महिला (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहेत. तसेच तलासरी, जव्हार आणि वाडा पंचायत समित्यांची सभापती पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आली आहेत.

पालघर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे प्रवर्ग या आरक्षणामुळे निश्चित झाले आहेत. आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व तयारी शासन नियमांनुसार पार पाडली जाईल. सभापती पद ग्रामस्तरावरील विकासकार्ये, शासकीय योजना आणि स्थानिक प्रशासनाचे कार्य प्रभावीपणे राबविण्यास महत्त्वाचे आहे. या आरक्षणाद्वारे स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक सुव्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने कार्यरत राहील, असा प्रशासनाचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teachers Constituency Election : शिक्षक निवडणुकीत ‘लक्ष्मीदर्शना’चा खेळ सुरू, काटाजोड लढतीमुळे उमेदवारांनी हात केला ढिल्ला

Copper is the New Gold: तांबे होणार नवं सोनं? Goldman Sachs चा मोठा अंदाज; किती वाढणार भाव?

WTC Standing : याला म्हणतात बदला! दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला डावाने लोळवले, झळ भारताला सोसावी लागली; अंतिम फेरीतून OUT?

Marathi News Live Updates: प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची सातव्यांदा चौकशी, नऊ तास सवाल जवाब

Manoj Jarange Audio Clip: जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; ''अडीच वर्षांनंतर हेतू काय...''

SCROLL FOR NEXT