मुंबई

दिवाळीकरिता कोकणात रेल्वेच्या विशेष गाड्या

CD

दिवाळीकरिता कोकणात रेल्वेच्या विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : दिवाळीच्या सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची व पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने एलटीटी-मडगाव  साप्ताहिक विशेष ट्रेन, तर पनवेल-चिपळूदरम्यान अनारक्षित मेमू गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रेन क्रमांक ०१००४  मडगाव-एलटीटी साप्ताहिक विशेष ट्रेन ५, १२ व १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता मडगावहून सुटेल. परतीची ०१००३ एलटीटी-मडगाव विशेष गाडी सोमवार ६, १३ व २० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.२० वाजता मडगावहून सुटेल. या गाड्यांना करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, वलिवडे, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल व ठाणे येथे थांबा देण्यात आला आहे.

पनवेल-चिपळूण मेमू विशेष
ट्रेन क्रमांक ०११६०  चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू विशेष ३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार ते रविवारी धावणार आहे. ही गाडी सकाळी ११.०५ वाजता चिपळूणहून सुटेल. परतीसाठी ट्रेन क्रमांक ०११५९ पनवेल-चिपळूण मेमू दुपारी ४.४० वाजता सुटेल. या गाडीला अंजनी, खेड, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापेवामे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदादूर, कोलाड, रोहा, नागोठाणे, कासू, पेण, जिते, आपटा व सोमाटाणे येथे थांबा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Auto Rickshaw Strike : राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता

INDA vs PAKA सामन्यात राडे! वैभवला डिवचलं, हर्षित राणालाही आक्रमक सेंडऑफ, तर तिलकशीही पाकिस्तानी खेळाडू भिडले; Viral Video

Crop Insurance: रब्बीच्या सहा पिकांना विमा ,कांद्याला हेक्टरी ९५ हजार, ज्वारीला ३६ हजारांची भरपाई

Satara News: अजूनही कागदावरच ४० रुपयांत नाश्ता; एसटीच्‍या योजनेची सहा महिन्यांपूर्वी घोषणा; स्वच्छतागृहांचाही बोजवारा

Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा जोर वाढला; जळगावमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, पुढील ३ दिवस कसे राहणार हवामान?

SCROLL FOR NEXT