मुंबई

बाजारपेठांत झेंडूच्या फुलांचा साज

CD

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुक्यातील बाजारपेठांमध्ये झेंडू फुले आणि तोरणांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विजयादशमी असल्याने पूजनासाठी आणि घरसजावटीसाठी आवश्यक झेंडूची फुले; तसेच झेंडू व पेव्याची तोरणे घेण्यासाठी नागरिकांनी बुधवारी (ता. १) बाजारात मोठ्या संख्येने गर्दी केली.
अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागांतून अनेक महिला झेंडू आणि तोरणांची विक्रीसाठी आल्या आहेत. यावेळी आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. बाजारात झेंडूचे दर प्रति किलो १०० ते १२० रुपयांपर्यंत गेले आहेत. झेंडूची लाल, पिवळ्या रंगाची फुले आणि रंगीबेरंगी फुलांचे तोरण व लाल रंगाच्या पेव्याच्या तोरणांना प्रचंड मागणी वाढली आहे. ग्राहक खरेदीसाठी आकर्षक होत आहेत. प्रत्येक तोरण ४० ते ५० रुपयाला विकले जात आहे. नागरिक घर, कार्यालय, दुकाने व वाहनांच्या सजावटीसाठी फुल आणि तोरण विकत घेत आहेत. शहरातील पूर्व पश्चिम स्थानक परिसर, मुख्य चौक, कल्याण-बदलापूर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक येथे नागरिकांनी फुल, हार, तोरण व पूजेचे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

दसरा पूजनाची तयारी
हातात काढलेली फुलांची गजरे, रांगोळीसाठी वापरण्यात येणारी फुले आणि पूजनासाठी लागणारी सामग्री घेऊन त्या सकाळपासून रस्त्याच्या कडेला बसल्या आहेत. दसरा पूजनासाठी लागणाऱ्या फुलांबरोबरच आंब्याची पाने, सुपारी, खोबरे, हार-फुले आणि प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंनाही बाजारात मागणी वाढलेली आहे.

सणासुदीच्या हंगामात शेतकरी व महिलांना रोजगार मिळत असल्याने आर्थिक हातभारही लागत असल्याची भावना आदिवासी महिलांनी व्यक्त केली. विक्रेतेही ही संधी पाहून मोठ्या प्रमाणावर स्टॉल्स लावून बसलेले आहेत.

अंबरनाथ : दसऱ्यानिमित्त बाजारपेठांत नागरिकांनी फुले, तोरणे खरेदीसाठी गर्दी केली होती.

....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

आधी सौंदर्यस्पर्धांवर बंदी, आता मृत्युदंडाची शिक्षा! बुर्किना फासोच्या निर्णयांची का आहे जगभरात चर्चा?

Latest Marathi News Live Update : तर आम्ही आणखी मोठा बॉम्ब फोडणार! मनोज जरांगे पाटील आक्रमक

SCROLL FOR NEXT