मुंबई

ऑनलाइन कर भरणा सुविधा तात्पुरती बंद

CD

उल्हासनगर, ता १ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेने मालमत्ता करधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शहरातील करदात्यांना अधिक आधुनिक, जलद आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी महापालिकेची संगणक प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची सुविधा तात्पुरती बंद राहणार आहे. मात्र, नागरिकांसाठी ऑफलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याने आपला कर वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

उल्हासनगर महापालिका सतत नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच धर्तीवर मालमत्ता कर विभागाने कामकाजात आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. संगणक प्रणालीचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची सुविधा १ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत बंद राहणार आहे.
ऑनलाइन सुविधा तात्पुरती बंद असली, तरी करदात्यांसाठी थेट कार्यालयात कर भरण्याची व्यवस्था सुरू आहे. नागरिकांनी कोणताही विलंब न करता आपला कर भरण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे महापालिकेच्या कर विभागप्रमुख मयूरी कदम यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे नागरिकांना काहीशी गैरसोय होऊ शकते; मात्र आगामी काळात संगणक प्रणाली पूर्णपणे सुधारित झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया अधिक सोयीस्कर, वेगवान व पारदर्शक होणार आहे.

जलद सुविधा मिळणार
महापालिकेच्या या उपक्रमामुळे प्रशासनाच्या सेवेत पारदर्शकता वाढेल, नागरिकांना अधिक जलद सुविधा मिळतील आणि डिजिटल माध्यमातून कर भरण्याच्या प्रक्रियेत विश्वासार्हतेचा नवा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Service : मेट्रोची सेवा हि नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे.

Pune Crime News : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात भरदिवसा तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने वार; मंदार किवळे गंभीर जखमी, दौंड-पाटसदरम्यान दोन संशयित ताब्यात

Latest Marathi News Live Update : सांगली बस स्थानकाच्या कारभाराविरोधात प्रवासी व विद्यार्थ्यांचे बस स्थानकात ठिय्या आंदोलन

Sharankumar Limbale Black and White Interview : "अस्पृश्यांपेक्षाही अधिक अस्पृश्य आयुष्य जगलो!" शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळेंची 'साम टीव्ही'वर रोखठोक मुलाखत; 'अक्करमाशी'तून मांडला वेदनेचा शिलालेख!

आंबेडकरी चळवळ हीच माझी आई! साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होताच शरणकुमार लिंबाळे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT