मुंबई

आरोपीची जन्मठेप न्यायालयाकडून कायम

CD

आरोपीची जन्मठेप न्यायालयाकडून कायम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पुण्यात पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा निर्घृण खून केल्याच्या आरोपप्रकरणी सॉफ्टवेअर अभियंत्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने नुकतीच कायम ठेवली.

पुण्यात २००८ मध्ये घडलेली ही घटना अत्यंत द्वेष, मत्सर आणि सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने आरोपीची जन्मठेप कायम ठेवताना नमूद केले. आरोपीने त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची क्रूरतेने हत्या केली होती. मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या दोषसिद्ध आरोपी मोहिंदर मधुरेशला पुणे येथील सत्र न्यायालयाने डिसेंबर २०१६ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला मोहिंदरने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, हे अपील न्यायालयाने फेटाळून लावले.  आरोपीने २० ऑक्टोबर २००८ रोजी पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची पुण्यातील सदनिकेमध्ये निर्घृण हत्या केली होती. त्या वेळी दोघेही २२ वर्षांचे आणि पुण्यात नोकरी करून राहात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Latest Marathi News Live Update : नवजात बाळाचा मृत्यूनंतर काही दिवसांतच मातेचाही मृत्यू

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT