मुंबई

१०२ वर्षीय डॉ. मोहन परमार यांचे देहदान

CD

१०२ वर्षीय डॉ. परमार यांचे देहदान
राज्यातील सर्वात वयोवृद्ध दात्याचा मान
विरार, ता. १ (बातमीदार) ः मुलुंड येथील डॉ. मोहन नाथुलाल परमार (वय १०२) यांनी मृत्यूनंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी देहदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. डॉ. परमार हे देहदान करणाऱ्या राज्यातील सर्वात वयोवृद्ध दात्यांपैकी एक ठरले आहेत.
डॉ. परमार यांचे मंगळवारी (ता. ३०) पहाटे निधन झाले. त्यांचे सुपुत्र डॉ. विक्रम परमार यांनी देहदानासाठी ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’चे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्याशी संपर्क साधला. डॉ. पवार यांनी परमार यांच्या मृत्यूनंतर ३० तासांनी गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वी केली. त्यानुसार डॉ. परमार यांचा देह बुधवारी सकाळी नऊ वाजता नायर हॉस्पिटलच्या शरीरविज्ञान शास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. विभागप्रमुख डॉ. युवराज भोसले यांनी १०० वर्षांहून अधिक वयाच्या या महादानी देहदात्यास वंदन केले. डॉ. परमार यांचे हे अंतिम औदार्य संपूर्ण समाजासाठी कायम प्रेरणास्रोत ठरेल, अशी भावना पुरुषोत्तम पवार यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT