मुंबई

धानिवरीत ‘आदी कर्मयोगी’ अभियानांतर्गत समावेशक ग्रामविकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी

CD

ग्रामविकास आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी
धानिवरीत ‘आदी कर्मयोगी’ अभियानांतर्गत विशेष उपक्रम
कासा,ता. २ (बातमीदार)ः जिल्ह्यातील धानिवरी ग्रामपंचायतीत आदी कर्मयोगी अभियानाचा प्रभावी अवलंब करण्यात आला. या अभियानांतर्गत ग्रामविकास आराखडा आणि ग्रामविजन २०३० तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महसूल गावनिहाय तयार केलेले आराखडे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
या उपक्रमानिमित्त आयोजित विशेष बैठकीस जनजाती मंत्रालय, दिल्लीच्या संचालक (भा.पो.से.) दिपाली मासीरकर, प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते आणि पालघर जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
बैठकीच्या प्रारंभी गावकऱ्यांनी पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरात ‘तारपा नृत्य’ सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षकांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे अभियानाची संकल्पना मांडण्यात आली. ग्रामपंचायत धानिवरीचे सरपंच शैलेश कोरडा, ग्रामविकास अधिकारी सतीश देशमुख, विविध गावांतील लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते.

आराखड्यात या गोष्टींचा समावेश
ग्रामकृती आराखड्यात शिक्षण, आरोग्य, रस्ते, पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुधारणा, मातृत्व व बालसंगोपन सेवांचा विकास, पाणी, वीज व स्वच्छता या सुविधावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, वीटभट्टी व इतर कारणांमुळे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक रोजगारनिर्मिती, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, युवक-युवतींसाठी कौशल्यविकास केंद्रे उभारण्याच्या योजनाही आराखड्यात आहेत.

ग्रामव्हिजनला दिशा
हा सशक्त व व्यावहारिक आराखडा २०३० पर्यंतच्या ग्रामव्हिजनला दिशा देणारा असून, केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आला आहे. आदी कर्मयोगी अभियान हे केवळ उपक्रम नसून नवचैतन्य निर्माण करणारे परिवर्तनाचे माध्यम आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Vasant Hankare: पोरांनाही रडवलं! वसंत हंकारेंनी स्वीकारलं चॅलेंज; म्हणाले, तू लाव कितीही ताकद...

Winter Low Water Intake Risks: हिवाळ्यात किती पाणी प्यायलं पाहिजे? प्रमाण कमी झाल्यास मेंदूसह शरीरावर होतात 'हे' परिणाम

SCROLL FOR NEXT