मुंबई

ॲक्सिस बँकेतर्फे यूपीआयवर सोने कर्ज आधारित पतपुरवठा

CD

मुंबई, ता. २ : ॲक्सिस बँकेने फ्रीचार्जच्या सहकार्याने यूपीआयवर सोने कर्ज आधारित पतपुरवठा सुरू केला आहे. यूपीआयमार्फत अशा पद्धतीची ही पहिलीच योजना आहे. या पद्धतीत ग्राहकांना सोन्यावर तत्काळ कर्ज मिळणार आहे. विशेषतः देशातील छोटे, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजक तसेच स्वयंरोजगार करणारे उद्योजक आणि व्यापारी यांच्याकडील सोन्याचे पुरेपूर मोल त्यांना मिळाल्याने त्यांना याचा मोठा फायदा होईल.

सर्व खातेदारांना या व्यवस्थेचा फायदा होईल. सोने कर्ज मंजूर झाल्यावर त्याचे पैसे देणे आणि त्या कर्जाचा परतावा या सर्व गोष्टी डिजिटल पद्धतीने होतील. त्यामुळे बँकेत वारंवार जाण्याची गरज राहणार नाही. यात केवळ घेतलेल्या आणि वापरलेल्या कर्जाच्या रकमेवरच व्याज आकारले जाईल. त्यामुळे उद्योजकांना खेळते भांडवल, व्यापारवृद्धी तसेच पैशाची तातडीची गरज यासाठी त्याचा उपयोग होईल. कर्ज परतावादेखील यूपीआय किंवा यूपीआय क्यूआर कोडमार्फत करता येईल, असे बँकेचे कार्यकारी संचालक मनीष शारदा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधी सोनं महागलं! चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Temple Tourism: पांडवांनी स्थापन केलेले मंदिर आता जगभरात गाजणार! सरकारकडून १ कोटींचा निधी मंजूर; स्वयंभू शिवलिंगाचे रहस्य काय?

Global Conflict: युद्धाचा तिढा कायम- पण निष्फळ वाटाघाटी पुन्हा सुरू?

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

SCROLL FOR NEXT