मुंबई

घरकुलसाठी वाढीव अनुदान कधी ?

CD

घरकुलसाठी वाढीव अनुदानाची प्रतीक्षा
११ हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आर्थिक विवंचनेत
जव्हार, ता. ४ (बातमीदार) ः राज्य तथा केंद्र शासनाच्या विविध आवास योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांना हक्काचे घरकुल मिळाले. यंदा तर तिप्पट म्हणजेच ११ हजार ४८६ घरकुले मंजूर झाली आहेत. शिवाय सरकारी उपाययोजनेनुसार या घरकुल लाभार्थ्यांना ५० हजार रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार होते, मात्र अद्यापही घरकुलाच्या वाढीव अनुदानाची ११ हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना केवळ प्रतीक्षाच आहे.
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात ११ हजार ४८६ घरकुले मंजूर झाली आहेत. सरकारकडून घरकुल बांधकामासाठी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना केवळ एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. बांधकाम साहित्याचे दर आणि वाढलेली महागाई लक्षात घेता, अनुदानाची ही रक्कम अपुरी आहे. अनुदानात वाढ करावी, अशी मागणी लाभार्थ्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यानुसार सरकारने मार्च महिन्यात ५० हजार रुपयांची वाढ केली. यात ३५ हजार रुपये घरकुलासाठी वाढीव अनुदान व १५ हजार रुपये घरावर सोलर यंत्रणा बसविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला, परंतु या निर्णयाला आता सहा महिने उलटले, मात्र अजूनपर्यंत पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही.

पंचायत समितीच्या येरझारा
५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थी पंचायत समितीच्या येरझारा मारत आहेत, मात्र निधीच उपलब्ध झाला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. निधी मिळाल्यानंतर त्याचे वितरण केले जाणार, असे सांगण्यात येते, शिवाय तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थ्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे, मात्र त्यांना शेवटचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी, त्यांनी घरावर सोलर पॅनेलची यंत्रणा बसविण्याचे कामही थांबविले आहे.

सरकारने घरकुल लाभार्थ्यांना ५० हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अजून अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत अंमलबजावणी झाल्यास ३५ हजार लाभार्थ्यांना खात्यात तर १५ हजार सौर यंत्रणेसाठी देण्यात येणार आहे.
- डी. एस. चित्ते, गटविकास अधिकारी, जव्हार

गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल अनुदान योजनेत वाढ करण्यात आली नव्हती, यंदा ५० हजार रुपये सरकारने वाढीव अनुदान म्हणून जाहीर केले, परंतु सहा महिने उलटूनही हे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे मोठी अडचण झाली आहे.
- रवींद्र गवते, घरकुल लाभार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT