बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक विभागाकडून कार्यवाही
नेरूळ, ता. ४ (बातमीदार) ः सीवूड्स येथील एचपी पेट्रोलपंपाजवळ चुकीच्या दिशेने भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नेरूळ वेल्फेअर फेडरेशन व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्तपणे केली होती. त्यानुसार नेरूळ वाहतूक पोलिसांकडून संबंधित ठिकाणी सूचनाफलक बसवले आहेत.
येथील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी वेळ वाचविण्याच्या नादात विरुद्ध दिशेने पेट्रोलपंपाकडे येतात. यामुळे परिसरात अपघातांची घटना सतत वाढत होती. स्थानिक संघटनांनी हे लक्षात घेत पेट्रोलपंप व्यवस्थापन व वाहतूक विभागाला पत्र दिले. या पत्रानंतर संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करत परिसरात सूचनाफलक बसवले व सीसीटीव्ही कॅमेरे लावले. यामुळे चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण शक्य झाले असून, अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरल्याचे संबंधित संघटनांनी स्पष्ट केले. नेरूळ वेल्फेअर फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश यावलकर, पदाधिकारी श्रीलता मुजुमदार, जयंत कपिले व सिद्धार्थ गायकवाड तसेच ॲड. कौस्तुभ मोरे यांनी या सकारात्मक पावलाबद्दल पेट्रोलपंपचालकांचे आभार मानले. तसेच वाहतूक शिस्त अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच आणखी एक सीसीटीव्ही कॅमेरा व मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत सूचनाफलक बसवण्याची सूचना दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.