पूरग्रस्त भागातील लहानग्यांना दसऱ्याची अनोखी भेट
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबलकडून शालेय साहित्याचे वाटप
पनवेल, ता. ४ (बातमीदार) ः महापुरामुळे शेतकरी समाजाला मोठा आर्थिक व मानसिक धक्का बसला आहे. या संकटाच्या काळात शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, असा संदेश भाजप नेते व जे. एम. म्हात्रे चॅरिटेबलचे अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, दसऱ्यानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या आवाहनाला पनवेल, उरण व खालापूरच्या नागरिकांनी तसेच विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शालेय साहित्याचे संकलन करण्यात आले. वह्या, दप्तर, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी अशा मूलभूत साहित्याचे संच तयार केले गेले. दसऱ्याच्या दिवशी या सोनेरूपी शालेय साहित्याचे वाटप करून लहान भावंडांना भेटवस्तू दिल्या गेल्या.
या उपक्रमाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील वागे-गव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पुस्तके, वह्या व पेन आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. निरागस डोळ्यांतून चमकणारा आनंद, शिक्षणाबद्दल जागलेली उत्सुकता आणि नवीन साहित्य मिळाल्याचा आनंद या सगळ्यांनी उपस्थितांना भावुक केले. या कार्यक्रमाला परांडा तालुक्यातील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दसऱ्याच्या दिवशी समाजासाठी अशा प्रकारची देणगी ही एक अनोखी सामाजिक सेवा ठरली. पुढील आठवड्यात परांडा तालुक्यातील एकूण १३८ जिल्हा परिषदेच्या शाळांतील ५,३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ३०० विद्यार्थ्यांना साहित्य संच वितरित करण्यात आले असून, पुढील पाच हजार संच येत्या काही दिवसांत शाळांमध्ये सुपूर्द केले जाणार आहेत.
.....................
कोट
या प्रयत्नातून एक संदेश जातो, की जिथे सर्व नागरिक एकत्र येतात तिथे कोणत्याही संकटाला आपण एकजुटीने सामोरे जाऊ शकतो. आपल्या लहान भावांना शिक्षणाची संधी मिळावी, हीच खरी सेवा आणि समाजासाठी योगदान. या भावनेने आम्ही माझे बाबा जे. एम. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो.
- प्रीतम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.