मुंबई

ठाणे पालिका लाचप्रकरण; सहाय्यक आयुक्तांच्याही बदल्या

CD

उपायुक्त शंकर पाटोळे निलंबित
पालिका प्रशासनातील सहाय्यक आयुक्तांच्याही बदल्या
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाखांची लाच घेताना अटक झाल्यानंतर २ ऑक्टोबरपासून निलंबित करण्यात आले आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने ही कारवाई झाली आहे. या प्रकरणामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली असून, प्रशासनाने मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.
१ ऑक्टोबरला पालिकेच्या वर्धापनदिनीच नौपाडा येथील भूखंडावरील अतिक्रमण काढण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पाटोळे यांना आणि त्यांच्या हस्तकाला अटक झाली होती. या सर्व प्रकारानंतर पालिका वर्तुळातील काही वादग्रस्त सहाय्यक आयुक्तही रडारवर आले असून, त्यांच्या बदलीचे सत्रही सुरू झाले आहे.
शंकर पाटोळे यांच्याकडील अतिक्रमण नियंत्रण विभाग आणि परिमंडळ-२चा कार्यभार काढून घेण्यात आला आहे, तर उपायुक्त उमेश बिरारी यांच्याकडे अतिक्रमण नियंत्रण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उपायुक्त दीपक झिंजाड यांच्याकडे परिमंडळ-२ (नौपाडा-कोपरी, वागळे प्रभाग) आणि उपायुक्त जी. जी. गोदापुरे यांच्याकडील क्लस्टर सेलचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात चार सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात विजय कावळे (वर्तकनगरवरून मुंब्रा), गणेश चौधरी (नौपाडावरून वर्तकनगर) यांचा समावेश आहे. सोपान नाईक यांना अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभाग मुख्यालयात नियुक्त करण्यात आले आहे.


पाटोळेंच्या पोलिस कोठडीत वाढ
मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाकडून २५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे आणि खासगी व्यक्ती ओमकार गायकर यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी (ता. ४) आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पाटोळे आणि गायकर या दोघांना बुधवारी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तसेच गुरुवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. याचदरम्यान या प्रकरणाचा तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या! एसटीला दररोज दीड कोटींचा तोटा; प्रशासनाचं नियंत्रण नाही, मंत्री सरनाईकांची नाराजी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांनो काळजी नसावी! आज पाणी पुरवठा बंद राहणार नाही

SCROLL FOR NEXT