मुंबई

‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’च्या दीड हजार जागा रिक्त

CD

‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’च्या दीड हजार जागा रिक्त
प्रवेशाची दुसरी फेरी समाप्त; एक हजारांहून अधिकांची प्रवेशाकडे पाठ

मुंबई, ता. ४ : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशाची दुसरी फेरी पूर्ण झाली. या फेरीत एमबीबीएसच्या ६३६ तर बीडीएसच्या ८९१ अशा एक हजार ५२३ जागा रिक्त राहिल्या आहेत. या फेरीसाठी प्रवेश निश्चित होऊनही एक हजार ४०१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली, तर २८ जणांनी आपले प्रवेश रद्द केले केले आहेत. प्रवेश मिळालेल्यांपैकी एमबीबीएसच्या तीन हजार १०५ आणि बीडीएसच्या ४९८ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश राखून ठेवले आहेत.

तिसऱ्या फेरीच्या नोंदणीला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. ती प्रक्रिया ८ ऑक्टोबरपर्यंत चालेल. त्यानंतर १५ ऑक्टोबरला प्रवेशाची यादी जाहीर होईल आणि १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीक्रमानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येतील. एमबीबीएस आणि बीडीएसच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची यादी जाहीर झाल्यानंतर २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली; मात्र राज्यातील पूरस्थ‍िती लक्षात घेऊन सीईटी सेलने २ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशाला मुदत दिली. त्या मुदतीनंतर दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या एमबीबीएसच्या आठ हजार ३३८ जागांपैकी आठ हजार २५९ जागांवर प्रवेश अलॉट झाले होते. त्यापैकी सात हजार ६९९ जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित ६३६ जागा रिक्त राहिल्या. तर बीडीसीएसच्या उपलब्ध असलेल्या २२ हजार ७१८ जागांपैकी दोन हजार ९६९ जागा अलॉट झाल्या होत्या. त्यापैकी एक हजार ८२७ जागांवर प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित ८९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. सीईटी सेलकडून रिक्त राहिलेल्या जागांसाठी लवकरच तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.


पहिल्या फेरीतील प्रवेश
वैद्यकीयच्या पहिल्या प्रवेश फेरीदरम्यान एमबीबीएस अभ्यासक्रमात राज्य कोट्यातील आठ हजार १३८ जागांपैकी आठ हजार १०६ जागांवर प्रवेशाची संधी या यादीत मिळाली होती. त्यापैकी सहा हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.  तर बीडीएस अभ्यासक्रमासाठी दोन हजार ७२५ जागांपैकी दोन हजार ७०९ जागा अलॉट झाल्या होत्या. त्यापैकी ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला होता. दुसरीकडे शासकीय महाविद्यालयांमध्ये ३२५ जागांपैकी ३११ जागा अलॉट झाल्या होत्या, तर खासगी दंत महाविद्यालयांत दोन हजार ३९८ जागा अलॉट झाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT