मुंबई

दहशत माजवणाऱ्या पवार पिता-पुत्रांना अटक

CD

उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : गरब्यातील गोळीबार प्रकरणात अखेर पोलिसांना यश मिळाले आहे. उल्हासनगरात दहशत पसरवणारे सराईत गुंड सोहम पवार आणि त्याचे वडील अनिल पवार यांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवान कारवाईत अटक केली आहे. पिता-पुत्राच्या ताब्यातून पिस्तुल जप्त केले आहे.
उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक २ मधील बंजारा विकास परिषदेच्या गरब्यादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत सोहम पवार (१९) आणि त्याचे वडील अनिल पवार यांना बुधवारी बेड्या ठोकल्या. या दोघांनी मिळून शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावर थेट बंदूक रोखत दहशत माजवली होती. घटनेदरम्यान सोहमने “मी इकडचा भाई आहे” अशी दमबाजी करत पिस्तुल काढले आणि हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यावेळी त्याचे वडील अनिल यांनीही मुलाला साथ देत परिसरात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, उत्सवाचे आनंदमय वातावरण क्षणात भीती आणि पळापळीत बदलले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सचिन गोरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. साक्षीदारांचे जबाब नोंदवून तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी उल्हासनगर पोलिस आणि गुन्हे शाखा यांनी शोधमोहीम राबवत कॅम्प क्रमांक ४ येथून पिता-पुत्राला अटक केली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT