मुंबई

भिवंडीत धर्मांतराचा डाव हिंदुत्ववाद्यांनी उधळून लावला

CD

भिवंडीत धर्मांतराचा प्रयत्न उधळला
अमेरिकन नागरिकासह तिघांना अटक
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा येथे आदिवासी लोकांच्या गरिबी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी साईनाथ गणपती सरपे (वय ४२), अमेरिकेचा नागरिक जेम्स वॉटसन (वय ५८) आणि मनोज गोविंद कोल्हा या तिघांना ताब्यात घेत अटक केली आहे.
पारोळ रस्त्यावरील भुईशेत गावात मनोज कोल्हाच्या घरासमोरील मोकळ्या जागेत येशू ख्रिस्तांच्या प्रार्थनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी तिघे जण हिंदू धर्मावर टीका करत, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास सुख-समृद्धी मिळेल, असे सांगून धर्मप्रचाराचे आणि धर्मपरिवर्तन करण्याचे काम करत होते. या लोकांनी लहान मुलींच्या कपाळावर हात ठेवून दैवीशक्तीचा वापर करून उपचार केल्याचे भासवले. स्थानिक नागरिक रविनाथ भुरकुट यांनी ही माहिती हिंदुत्ववादी संघटनांना कळवली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले.
जेम्स वॉटसन हा मूळचा अमेरिकेचा असून, तो सुरुवातीला टुरिस्ट व्हिसा आणि नंतर व्यावसायिक व्हिसा घेऊन भारतात वास्तव्यास आहे; मात्र तो कोणताही व्यवसाय न करता ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये धर्मांतराचे काम करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेचे संदीप भगत यांनी केला आहे. पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT