अॅमेझॉन आणि मनसेच्या वादावर पडदा?
दिवाणी खटला मागे घेण्यासाठी कंपनीचा अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः अॅमेझॉन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मनसैनिक अखिल चित्रे यांच्याविरुद्ध दाखल केलेला दिवाणी खटला मागे घेण्यासाठी मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अॅमेझॉन विरुद्ध मनसे वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिंडोशी न्यायालयात अॅमेझॉनने मनसेविरोधात दिवाणी आणि फौजदारी खटला केला होता. त्याची दाखल घेऊन न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना समन्स बजावले होते. तथापि, ठाकरे गैरहजर राहिले होते. नुकतीच या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्या वेळी अॅमेझॉनने खटला मागे घेण्यास तयारी दर्शवली. मनसेनेही त्याविरोधात कोणताही आक्षेप नसल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर, न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आणि १२ जानेवारी २०२६ला सुनावणी ठेवली.
काय प्रकरण?
अॅमेझॉन अॅपवर मराठी भाषेचा पर्याय नसल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी अॅमेझॉनचे पोस्टर फाडल्याचा आरोप करून अॅमेझॉन ऑनलाइन पोर्टलने दिंडोशी न्यायालयात मनसेविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.