डॉ. आंबेडकर उत्कृष्ट संस्था पुरस्कार स्टडी व्हेवजला
कल्याण (वार्ताहर) : ज्या महामातांनी समाजजागृतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन ज्ञानज्योत प्रज्वलित केली, त्यांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती (अंतर्गत)तर्फे बहुजन महामाता जनजागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संस्था पुरस्कार स्टडी व्हेवज या बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आला. या महोत्सवांतर्गत विविध विषयांवर व्याख्याने, समाजातील परिवर्तनशील विचार अधोरेखित करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजातील जनजागृतीची परंपरा अधिक बळकट होत असून, पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची प्रतिक्रिया स्टडी व्हेवज बहुउद्देशीय संस्थेचे उमाकांत चौधरी यांनी दिली.