मुंबई

अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर पीकांचे नुकसान

CD

अवकाळीमुळे भातपिकांचे नुकसान
प्रशासनाकडून पंचनामे सुरू; १०५ कर्मचारी शिवारामध्ये दाखल
पेण, ता. ५ (वार्ताहर) : राज्यभर अवकाळी पावसाने हाहाकार उडविल्याने सर्वत्र भातशेतीचे फार मोठे नुकसान झाले असताना पेण तालुक्यातदेखील हजारो हेक्टर भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी याकरिता योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तानाजी शेजारी यांनी केले आहे.
मागच्या महिन्यातील २६ ते २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यातील भातशेतीला याचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेली पिके बऱ्याच अंशी जमीनदोस्त होऊन कुजली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून याबाबतचा प्राथमिक अहवाल कृषी खात्याने महसूल खात्याकडे सुपूर्त केला असून त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू केले आहेत. यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक असे जवळपास १०५ कर्मचारी प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या आदेशानुसार भात व इतर पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्‍यानुसार शेतीनिहाय पंचनामे करून अंतिम अहवाल व शेतकरी यादी गावचे महसूल अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी संबंधित खात्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश असल्याने तसा अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी सांगितले आहे.
..................
पेण तालुक्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या आदेशानुसार महसूल कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून पंचनामे तातडीने करत सदरचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांनी योग्य तीच माहिती देऊन सहकार्य करावे, असे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सांगितले.
तानाजी शेजाळ- तहसीलदार पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर अमित शाहांच्या दारात बसणार'', अंजली दमानियांचा इशारा

Ind Vs SA 2nd Test : भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ गौतम गंभीरवर संतापला; म्हणाला, दादागिरी दाखवली की हेच होतं...

Nitesh Rane : 'ये अंदर की बात है, दीपकभाई हमारे साथ है!' नीतेश राणेंचा सनसनाटी दावा, छुप्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण?

Bird Election 2025 : शहर पक्षी निवडणुकीवर स्थलांतरित पक्ष्यांची नजर; बॅलेटसह डिजिटल प्रचारावर भर, कुठं सुरु आहे निवडणूक?

Video : "माझं तुमच्यावर प्रेम आहे" ईश्वरीने अर्णवला दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

SCROLL FOR NEXT