मुंबई

रंगीबिरंगी फुलपाखरांचा मुक्त संचार

CD

रंगीबिरंगी फुलपाखरांचा मुक्त संचार
ब्ल्यू मॉरमॉन, सदर्न बर्ड विंगसह जिल्ह्यात १४७ प्रजाती
पाली, ता.६ (वार्ताहर): १ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशात फुलपाखरू महोत्सव साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातही पश्चिम घाटाचा पट्टा, मुबलक झाडेझुडपे, निसर्ग संपदेमुळे ब्ल्यू मॉरमॉन, पश्चिम घाटामधील दुर्मिळ सदर्न बर्ड विंगसह तब्बल १४७ प्रजातींचा मुक्तसंचार आहे.
जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगात सुरू आहे. त्यामुळे झाडेझुडपे, वेली, वनस्पती तोडल्या गेल्याने फुलपाखरांना खाद्य मिळत नाही. त्यांचा अधिवास नष्ट होतो. तसेच प्रजनन होत नाही. कारखान्यांमधील प्रदूषके फुलपाखरांच्या जीवनक्रमावर प्रतिकूल परिणाम करतात. फुलपाखरांसाठी प्रजननासाठी कडुनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, अशोकाच्या झाडांमुळे पोषक वातावरण आहे. पण लांबलेल्या पावसाने फुलपाखरांच्या स्थलांतरावर यंदा थोडा परिणाम झाला असला तरी विविध प्रजातींचा वावर असल्याचे अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले.
-----------------------------------
तणनाशकांचा वापर घातक
तीनवीरा धरणाजवळ फुलपाखरांसाठीचे खासगी उद्यान आहे. परसबागेत किंवा छोटे उद्यानांमधून फुलपाखरांना आकर्षित करतात. काही प्रजाती झुडपांवर अंडी घालतात. मात्र, जिल्ह्यात तणनाशकांच्या वाढत्या वापरामुळे फुलपाखरांच्या अळ्यांना खाद्य मिळत नाही. त्यांचा मृत्यू होतो. यामुळे तणनाशकांच्या वापरावर मर्यादा येण्याची गरज ग्रीनटच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
--------------------------------
फुलपाखरांसाठी जिल्ह्यात सुरक्षित पर्यावरण आहे. घराशेजारील परसबागेत विविध फुलपाखरांसाठी अनेक जण फूड प्लांट लावतात. शिवाय पपई, पेरू अशी पिकलेली फळे किंवा सडका बांगडा मासा घराच्या अंगणात ठेवून फुलपाखरांना आकर्षित करता येते.
- शंतनू कुवेस्कर, फुलपाखरू अभ्यासक, माणगाव
-----------------------------------
भारतात फुलपाखरांच्या १,५०० जाती तर महाराष्ट्रात सुमारे ३४५ जाती आढळून येतात. त्यातील राणी पाकोळी (ब्ल्यू मॉरमॉन), बहुरूपी, गुलाबी राणी, पितांबरी, सांजपरी, हळदी-कुंकू, नील भिरभिरी, मयूर भिरभिरी व शुष्क पर्ण अशा तब्बल १४७ प्रजाती रायगड जिल्ह्यात आहेत.
- प्रवीण कवळे, प्राणी-पक्षी अभ्यासक, अलिबाग
-------------------------------
फुलपाखरांच्या अधिवसाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. फुलपाखरू परागीकरणास खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य करतात. त्यामुळे जैवविविधता राखण्यासाठी उपयुक्त आहेत.
- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: अखेर बिहारमध्ये रणशिंग फुंकलं! निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

Jasprit Bumrah: '...तर कदाचित बुमराह कधी गोलंदाजी करू शकला नसता', मोहम्मद सिराजने उलगडलं बुमराहच्या 'वर्कलोड'चं कोडं

Agricultural News : अतिवृष्टीने मजुरांच्या स्वप्नांची राखरांगोळी: पाचोरा तालुक्यात शेतीत काम मिळेनासे झाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

SCROLL FOR NEXT