मुंबई

“जगा आणि जगू द्या”चा संदेश

CD

‘जगा आणि जगू द्या’चा संदेश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा अनुभव
ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) ः निसर्ग आणि वन्यजीवांपासून दूर चाललेल्या मानवाला पुन्हा त्याच्यासोबत जोडण्यासाठी ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश लोकांमध्ये पोहचविण्यासाठी वन विभागाकडून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वन्यजीवांना जगू देऊ आणि आपणही जगू, असा संदेश देत वन्यजीवांची माहिती करून घेतली. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांकडून स्पायडर पासून भेकड, हरीण, माकड, बिबटे आदी वन्य प्राण्यांची माहिती जाणून घेतली. ठाणेकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
ठाणे, मुंबईला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असंख्य प्रकारच्या झाडांसोबतच विविध प्रकारचे वन्य जीव राहतात. उद्यानाला नागरी वसाहतींनी वेढा घातलेला असला तरी वन्य विभाग आणि विविश सामाजिक संस्थांच्या मदतीने उद्यानातील निसर्ग टिकून आहे. त्यातील वन्यजीवांची संख्या वाढू लागली आहे, मात्र काही प्रमाणात काही लोकांचा येथे हस्तक्षेप होऊ लागल्याने सर्वच लोकांमध्ये वन आणि त्यामधील जीव जंतूची माहिती असणे आवश्यक आहे. निसर्ग आणि वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये यासाठी वन विभागाकडून येऊर वन परिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहाचे (१ ते ७ ऑक्टोबर) आयोजन करण्यात आले होते. उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवून वन्यजीवांची माहिती आणि गरज जाणून घेतली.
विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. छोट्या मुलांनी आपल्या कल्पनेच्या कॅनव्हासवर वाघ, हरण, पक्षी, आणि झाडांचे सुंदर जग रेखाटले. काहींनी वन्यजीवांचे रक्षण म्हणजे मानवजातीचे रक्षण हा संदेश चित्रातून मांडला. विद्यार्थ्यांसाठी निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी जंगलातील जीवन प्रत्यक्ष अनुभवले. पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची झुळूक आणि ओल्या मातीतून उठणारा सुगंध याचा अनुभव घेतला. निसर्ग, भेट, शाळा भेट, फ्लोरा कॉक, बटरफ्लाय वॉक, ट्रेक, ऑनलाइन व्हेबिनारमधून वन्यजीव आणि निसर्गाची माहिती देण्यात आली. विविध विषयांवर घेण्यात आलेल्या ऑनलाइन वेबिनारमध्ये आदित्य गडकरी, राजू कासांबे, मयुरेश कुलकर्णी, डॉक्टर परवीश पंड्या, प्रथमेश देसाई, अभिषेक साटम आदी तज्ज्ञांनी सहभाग घेतला.


मानवाच्या विकासासाठी आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी निसर्गाचे संरक्षण महत्त्वाचे आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक वन्यजीव जगला आणि वाढला पाहिजे. मानवाने त्यांच्या जगण्यात हस्तक्षेप करू नये त्यांना त्यांच्या अधिवासात आणि आपण आपल्या अधिवासात सुखाने जगायला पाहिजे.
- शुभम हडकर, निसर्ग शिक्षण आणि विस्तार अधिकारी, येऊर

फक्त शाळांपुरता हा उपक्रम न थांबता, येऊर वन क्षेत्रातील पाड्यांमध्येही जनजागृती मोहीम राबवण्यात आली. स्थानिक नागरिकांना वन्यजीव संवर्धनाचे सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व समजावण्यात आले. “प्रत्येक पाडा, प्रत्येक घर, प्रत्येक माणूस निसर्गाचा रक्षक बनला पाहिजे,” हा संदेश प्रत्यक्ष संवादातून पोहोचवला गेला.
मयूर सुरवसे, वन परिक्षेत्र अधिकारी येऊर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Supriya Sule : सरन्यायाधिशांवरील हल्ल्याची संसदेत चर्चा घडवून आणा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Pune News : मतदार यादीच्या विभागणीची जबाबदारी दोन अधिकाऱ्यांवर

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

Abhishek Sharma ची 'ती' एक गोष्ट ब्रायन लाराला खूप भावली; म्हणाला, ट्वेंटी-२०त मैदान गाजवतोय, पण...

शाहरुख स्क्रिप्टमध्ये इतका गुंतलेला असायचा की... निवेदिता यांनी सांगितली 'किंग अंकल'ची आठवण; म्हणाल्या- जॅकी श्रॉफ आणि मी...

SCROLL FOR NEXT