मुंबई

शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी

CD

विक्रमगड (बातमीदार) : सततच्या पावसामुळे विक्रमगड तालुक्यात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पिकांचे पंचनामे आणि कागदपत्रांच्या खेळात शेतकऱ्यांना गुंतविण्याचे काम करताना सरकार आणि प्रशासन दिसत आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याची मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आली.

एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याला तत्काळ मदत मिळावी, म्हणून ई-पीक पाहणी करण्याचे सरकारकडून सांगण्यात येते. शेतकरीदेखील धावपळ करीत ई-पीक पाहणी करतो. त्यामध्ये शेतकरी सर्व माहिती भरत असतो, मात्र नुकसान झाल्यास भरपाईची मागणी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना पुन्हा विविध कागदपत्रांमध्ये अडकवते. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे. भरपाईच्या जाचक अटी आणि शर्ती आहेत. त्या कमी करून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शिवसेना तालुका संघटक प्रमोद पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेक जाधव, वैष्णवी व्यापारी, मनीषा भानुशाली, दीपा सूर्यवंशी, ऋषिकेश ढोन्नर, सूरज देसले, श्याम वाघेरे, मिलिंद महाकाल, संतोष महाला उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीची मागणी
पालघर : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी दिलेले शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन पाळलेले नाही. सरकार स्थापनेला वर्ष उलटल्यानंतरही हे आश्वासन हवेतच विरले आहे, असा आरोप ठाकरे गटाने राज्य सरकारवर केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. ८) पालघर तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून मुक्त करावे. पीकविम्याचे जाचक निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा, अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यकांना देण्यात आले. या वेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनूप पाटील, अजय ठाकूर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

SCROLL FOR NEXT