‘मेट्रो मुंबई वन’ आजपासून सेवेत
एकाच ॲपच्या माध्यमातून ११ वाहतूक सेवांचे तिकीट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः ‘एमएमआरडीए’ने तयार केलेल्या ‘मेट्रो मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे बुधवारी (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हे ॲप गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या एकाच मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपनगरीय लोकल सेवेसह मेट्रो, मोनेरेल, बेस्टसह वेगवगेळ्या ११ सार्वजनिक वाहतूक सेवांची तिकिटे प्रवाशांना सहज काढता येणार आहेत. त्याचबोरबर प्रवासी आणि पर्यटकांना आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करता यावे, म्हणून हे ॲप मार्गदर्शक ठरणार आहे.
मुंबई वन हे देशातील पहिले एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲप ठरले असून त्याच्या मदतीने एकच क्यूआर आधारित डिजिटल तिकिट वापरून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वेत सहज प्रवास करता येईल. या ॲपमुळे मोबाईलमध्ये अनेक ॲप्स ठेवण्याची गरज भासणार नसून कागदी तिकिटांची गरज लागणार नाही. या ॲपमध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी या त्रिभाषिक इंटरफेस असून, ‘शेअर माय लोकेशन’ आणि ‘आपत्कालीन हेल्पलाइन’ यासारखी प्रवासी सुरक्षेची वैशिष्ट्ये उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना ॲपमधून रियल टाइम माहिती मिळू शकणार आहे. तसेच डिजिटल वॉलेट्स व प्रीपेड बॅलन्सद्वारे व्यवहार पूर्णपणे रोखरहित (कॅशलेस) करता येतील.
पर्यटकांना खाद्यपदार्थ, सांस्कृतिक केंद्राची मिळणार माहिती
- मुंबई वन ॲपमध्ये प्रवासाशिवाय इतरही माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये तुम्ही असलेल्या शहरात कुठे, काय निवडक खाद्यपदार्थ मिळतात, तेथील सांस्कृतिक केंद्रांची माहितीही सहजपणे उपलब्ध होऊ शकणार आहे. याचा सर्वाधिक फायदा पर्यटकांना होणार आहे.
- नकाशावर आधारित तपशील व बस थांबे, मेट्रो, रेल्वे व मोनोरेल स्थानके, त्याची माहिती आणि ठिकाण समजणार आहे. मॉल, पेट्रोलपंप अशा उपयुक्त ठिकाणांचा नकाशावर आधारित तपशील पाहता येणार आहे.
या वाहतुकीच्या सेवेचा समावेश
- मेट्रो २अ व ७ मार्गिका
- मुंबई मेट्रो ३ मार्गिका
- मुंबई मेट्रो १ मार्गिका
- मुंबई मोनोरेल
- नवी मुंबई मेट्रो
- मुंबई उपनगरीय रेल्वे
- बेस्ट परिवहन
- ठाणे महापालिका परिवहन
- मिरा-भाईंदर महापालिका परिवहन
- कल्याण-डोंबिवली महानगर परिवहन
- नवी मुंबई महानगर परिवहन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.