डहाणू, ता. ९ (बातमीदार) : पश्चिम समुद्रकिनारपट्टीवरील गावांत सातत्याने विविध वीज समस्या उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणून, वीजपुरवठा सुरळीत आणि अखंडपणे सुरू राहण्यासाठी महावितरणच्या पालघर विभागामार्फत वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी ५७ कोटी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत समुद्रकिनाऱ्यालगतच्या तीन किमी परिघातील वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यात येणार आहेत.
डहाणू तालुक्यात वीजखांब पडून दुर्घटना घडणे, विजेअभावी व्यवसाय बंद राहणे, कृषिपंप बंद राहात असल्याने उत्पादन घटणे, त्याचबरोबर अतिवृष्टी आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक घटना घडत असतात. परिणामी अनेकदा पुरवठा वारंवार खंडित होतो आणि त्याचा फटका काही दिवस ग्राहकांना बसतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपायांकरिता चिंचणी, वरोर, वाढवण, धुमकेत, अब्राम, गुंगवाडा, तडीयाळे, धाकटी डहाणू, डहाणू गाव, बोर्डी, बोरीगाव, घोलवड, नरपड, चिखले, आंबेमोरा, खाडीपाडा, बागपाडा या गावांमध्ये भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामध्ये ९५.२२ किमीची उच्चदाब वीजवाहिनी, तर १६९ किमीची लघुदाब वीजवाहिनी भूमिगत टाकण्यात येणार आहे. हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. २४ जानेवारी २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे काढलेल्या निविदा रकमेच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने ती रद्द करण्यात आली आहे. २०२१ ते २०२६ या पाच वर्षांसाठी फेरनिविदा काढण्यात आली आहे.
चार तालुक्यांसाठी विभागीय कार्यालय
डहाणू येथे महावितरण कंपनीचे नवीन विभागीय कार्यालय उभारून डहाणू, जव्हार, तलासरी आणि मोखाडा या तालुक्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.