मुंबई

कळव्याला समस्यांची कळ

CD

कळव्याला समस्यांची कळ
कोंडी, फेरीवाले, वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त
स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः ठाणे शहराप्रमाणेच कळवा वाहतूक कोंडीत अडकत चालले आहे. बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांची समस्या आहे. त्यात वाढत्या गुन्हेगारीने शहरात दहशत पसरत चालली आहे. घरफोडी, चोरी, सोनसोखळी चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहे. जागोजागी असणारे दारूचे अड्डे आणि वाढत्या अमली पदार्थाची तस्करी चिंतेत भर टाकत आहे. त्यामुळे कळवा पूर्व आणि पश्चिमेला स्वतंत्र पोलिस चौकी देऊन गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा उपशहराचे राजकीय महत्त्व वाढले आहे. सर्वच प्रमुख पक्षाने मिशन कळवा सुरू केले असून माजी नगरसेवकांचे या पक्षातून त्या पक्षात स्थलांतर सुरू आहे; मात्र कळवावासीयांना रोजच विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. या शहराचा विकास झपाट्याने होत आहे, तसेच येथील वाढती झोपडपट्टी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. पाणी, विजेची समस्या दैनंदिन झाली आहे; पण आता हे शहर येथील रहिवाशांना असुरक्षित भासू लागले आहे. यासंदर्भात अपर्णाराज सहकारी गृहनिर्माण सोसायटीने पुढाकार घेतला असून थेट पोलिस आयुक्तांनाच साकडे घातले आहे.

कळव्यात घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार वाढल्यामुळे कमालीची असुरक्षितता वाढली आहे. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. येथील अनेक झोपडपट्टी परिसरात आणि मोक्याच्या ठिकाणी खुलेआम अवैध दारूचे अड्डे चालवले जात आहेत. अमली पदार्थांची तस्करीही वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात लिहिले आहे. एकीकडे गुन्हेगारी वाढत आहे तर दुसरीकडे वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांचा जाच वाढल्याची समस्याही मांडली आहे. रस्त्यावर बेकायदा पार्किंग व फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. आपत्कालीन वाहनांना जाण्यात अडचण येते. त्यात रिक्षाचालकांची मनमानी वाढल्यामुळे त्रासात भर पडली आहे. पूर्वी कळवा पूर्व येथे पोलिस चौकी होती. त्याचे स्थलांतरण झाल्यामुळे कायद्याचा धाक कमी झाला आहे. त्यामुळे कळवा पूर्व आणि पश्चिम येथे स्वतंत्र पोलिस चौकी देत सीसीटीव्ही आणि गस्त वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कळवावासीयांचे साकडे
कळवा पूर्व येथे कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करावी. रस्ते अडवडणारे बेकायदा फेरीवाले व अवैध पार्किंग हटवण्यात यावे. अवैध दारूची दुकाने, अमली पदार्थविक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. चोरी, घरफोडींना आळा बसण्यासाठी पोलिस गस्त वाढवण्यात यावी.

वर्षाला १,२०० गुन्ह्यांची नोंद
२०११च्या जनगणनेनुसार कळव्याची लोकसंख्या १६ हजार २८९ इतकी आहे; पण आता ही लोकसंख्या अडीच लाखांच्या पुढे सरकली आहे. एकीकडे टोलेजंग इमारती तर दुसरीकडे झोडपट्ट्या असा पसारा या उपशहराचा आहे. येथील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कळवा पोलिस ठाण्यावर आहे. पश्चिम भागात असलेल्या या पोलिस ठाण्यात सुमारे १२५ अधिकारी- कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. हाती असलेल्या पोलिसबळाची कुमक समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते; पण कळवा पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा अंदाज घेतला असता वर्षाला १,२०० ते १,५०० इतकी नोंद होत आहे. म्हणजे महिन्याला सरासरी शंभर गुन्ह्यांची नोंद होत आहे. यामध्ये चोरी, घरफोडीपासून ते हत्यांपर्यंच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

रिक्षाची डोकेदुखी कायम
कळव्यातील घोलाईनगरमध्ये रिक्षाचालकांनी असहकार पुकारला आहे. येथील अनधिकृत बाजारामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे पूर्ण भाडे घेऊनही अनेकवेळा प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच उतरावे लागत आहे. याविरोधात येथील शेअरिंग रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सेवा पुन्हा सुरू झाली; मात्र कोंडीमुळे एका फेरीसाठी तासाभराचा वेळ लागत असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यासंदर्भात कळवा पारसिक प्रवासी संघटना आणि स्थानिक सोसायट्यांनी प्रशासनासोबत वारंवार पाठपुरावा केला; पण कोणतीच दाद मिळत असल्याने कळवावासीय आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी सिद्धेश देसाई यांनी दिली.
..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT