मुंबई

मुख्य अडथळ्याकडे रस्ते प्रशासनाचे दुर्लक्ष

CD

रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट
वाहतूक कोंडीला निमित्त; नागरिकांकडून पूर्ण करण्याची मागणी
ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) ः घोडबंदर मार्गावर रस्ता रुंदीकरणासह मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. गायमुख चौपाटीजवळ काम अर्धवट सोडल्यामुळे हा रस्ता वाहतूक कोंडीचे निमित्त ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे गायमुख घाटाच्या काही मीटर आधी अर्धवट सोडलेला हा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
घोडबंदर मार्ग वाहतुकीकरिता महत्त्वाचा मानला जातो. न्हावा-शेवा बंदर ते गुजरातदरम्यान असलेल्या या रस्त्यावरून रोज हजारोंच्या संख्येने अवजड वाहनांची वाहतूक होत असते. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी नियंत्रणात ठेवण्याकरिता एमएमआरडीए, ठाणे पालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध प्रकारची कामे केली जात आहेत. माजिवडा ते गायमुख घाटापर्यंतच्या रस्ता रुंदीकरण, मेट्रोचा मार्ग भाईंदरपाड्यापर्यंत नेला असून, मार्गाचे चार पदरीकरण केले जात आहे. याशिवाय आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल बांधले आहेत, मात्र गायमुख चौपाटीजवळचा रस्ता रुंद करून अर्धवट सोडला आहे. येथील डोंगर कापून बंद केलेला रस्ता पुढे गायमुख घाटापर्यंत नेला जाणार आहे. त्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण झाले असून, गायमुख चौपाटीजवळ अवघ्या काही मीटरचे काम बाकी आहे. हे ठिकाण वळणाचे असल्यामुळे फाउंटनकडे जाणारी अवजड वाहने येथे अडकून पडतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.


गायमुख चौपाटीजवळ ठाणे फाउंटन वाहिनीवर ही समस्या उद्भवली असून, माजिवडा येथून रस्ता रुंद होत इथपर्यंत आला आहे. हे ठिकाण वळणाचे असल्यामुळे फाउंटनकडे जाणारी अवजड वाहने येथे अडकून पडतात. त्यामुळे येथे मोठी कोंडी होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत असलेला हा भाग काढून रस्त्याचे काम सुरू करायला हवे.
- शोभा लोणारे, स्थानिक नागरिक, कशेळीपाडा

फोटो : ठाणे- भाईंदर वाहिनीवर गायमुख चौपाटीजवळ रस्त्याचे झालेले अर्धवट काम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरात बोगस मतदार, आमदार चंद्रकांत पाटील यांचा संताप

बापरे! एवढं मोठं मंगळसूत्र... अखेर शंभूराजची झाली प्राजक्ता; कन्यादानावेळी नवरीबाईला कोसळलं रडू; रॉयल लूकवर चाहते फिदा

AI Revolution in Fetal Medicine: फीटल मेडिसिनमध्ये एआयची क्रांतिकारी कमाल; आता गर्भातील बाळावरही उपचार शक्य

Mumbai News: ३ दिवसांत स्पष्टीकरण नाही तर काम थांबवणार! बुलेट ट्रेन प्रकल्पावर संकट; दोन कंत्राटदारांना महापालिकेची नोटीस, कारण...

SCROLL FOR NEXT