मुंबई

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी बैठकीची विनंती

CD

टोकावडे, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दालनात विशेष बैठक घेण्याची विनंती निवेदनाद्वारे केली आहे. आमदार म्हात्रे यांनी सुचवले की, या बैठकीत संबंधित मंत्री, अधिकारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी सहभागी होऊन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर ठोस निर्णय व्हावा. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदान, अंशतः अनुदानित व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. १४ ऑक्टोबर २०२४च्या सरकार आदेशानुसार त्रुटी पूर्तता पूर्ण केलेल्या शाळांना मान्य टप्पा वाढ अनुदान देणे. २०२२-२३ मध्ये पटसंख्या निकषांमुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शाळांना २०२३-२४ किंवा २०२४-२५च्या पटसंख्येनुसार अनुदान मिळवून देणे. बीएमसीमधील शिक्षकांना डीसीपीएस लागू करणे, राज्यातील शाळांना वीज, कर व पाणीबिल घरगुती दराने आकारणे. २५ टक्के आरटीई प्रवेश दिलेल्या सेल्फ फायनान्स शाळांना प्रलंबित थकबाकी देणे. अर्धवेळ शिक्षकांना सेवा संरक्षण व उन्नयन देणे. शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका करणे. नवी मुंबई महापालिकेतील शिक्षणसेवक व कंत्राटी शिक्षकांना कायम सेवा देणे. खोपोली नगर परिषदेच्या शाळांसाठी नगरविकास मंत्रालयाकडून अनुदानाचा हेड उपलब्ध करून देणे. मुंबई शिक्षण संस्थेशी संबंधित मागण्यांचा विचार करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून शिक्षकांच्या समस्या मार्गी लागतील आणि बैठकीची वेळ लवकर निश्चित करावी, अशी अपेक्षा आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT