मुंबई

जागरुक कार्यकर्त्यांचा ‘श्रमजीवी’तर्फे ‘स्वातंत्र्यदूत’ने गौरव

CD

पालघर, ता. ९ ः पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना सलग दोन दिवस झोतात आहेत. आदिम कातकरी समाजातील मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री होत असल्याचे तीन धक्कादायक प्रकार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आले आहेत. मोतीराम वारे, संजय मुकणे, तर कमलाकर वाघ यांच्यामुळे हे प्रकार उघडकीस आले. श्रमजीवी संघटनेच्या विशेष कार्यक्रमात गुरुवारी (ता. ९) ‘स्वातंत्र्यदूत’ या विशेष पुरस्काराने संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या हस्ते तिघांचा गौरव करून समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.

वाडा तालुक्यातील परळी परिसरातील बुधावली येथील १४ वर्षीय मुलीचे संगमनेर येथील एका तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. २०२२ मध्ये उच्च जातीतील तरुणासोबत एका दलालामार्फत हा विवाह जुळवून देण्यात आला. दारिद्र्याचा फायदा घेऊन आई-वडिलांनी विरोध केल्यानंतरही त्यांना बदनामीची भीती दाखवून गळचेपी करण्यात आली. गर्भवती मुलीची नोंदणी दवाखान्यात करण्यासाठी वय वाढवून बनावट आधार कार्डही करण्यात आले होते; मात्र तिला मुलगी झाल्याने सगळे गणित बिघडले. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण होऊ लागली. तसेच, तिला उपाशी ठेवले जात होते. या छळास कंटाळून ती आपल्या गावी आली व श्रमजीवी संघटनेच्या पालघर जिल्हा महिला ठिणगीप्रमुख रेखा पऱ्हाड, तालुकाध्यक्ष भरत जाधव, सचिव सूरज दळवी, मोतीराम वारे यांच्या हस्तक्षेपाने हा प्रकार उघड झाला.

शहापूर तालुक्यातील शेणवा येथे ५० हजारांच्या मोबदल्यात एका मुलीच्या पालकांना प्रकाश मुकणे याने पैशांचे प्रलोभन दाखवून पारनेर तालुक्यातील बाबुलवाडी येथील जय शिर्के या तरुणाशी लग्न ठरविले; परंतु लग्नाच्या दिवशी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घटनेची चाहूल लागताच श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुकाध्यक्ष मालू हुमणे, सचिव प्रकाश खोडका यांनी मुलीच्या लग्नाचा कट उधळून लावला.

जव्हारमधील कुतूरविहीर येथे ८५ हजारांत एका महिला दलालाने १४ वर्षीय मुलीची लग्नासाठी देवाणघेवाण ठरवली होती. मुलीला तिच्या कुटुंबीयांसोबत बोलावून घेत त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात मोबाईलवर मंगलाष्टके लावून जळगावमधील सचिन पाटील यासोबत लग्न लावण्यात आले. त्यानंतर अतिश्रमाची कामे, दुसऱ्यांच्या शेतात राबवून घेतले गेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून आईच्या मदतीने तिचा गर्भपात घडवून आणण्यात आला. तिचा छळ, मारहाण करून दागिने काढून घेऊन तिला घरातून रात्री हाकलून देण्यात आले. याप्रकरणी श्रमजीवी संघटनेचे संघटक सचिव सीता घाटाळ, तालुकाध्यक्ष अजित गायकवाड, सचिव संतोष धिंडा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

विविध गावांमध्येही घटना
या तिन्ही घटना अमानवी आणि बालविवाह कायद्याची पायमल्लीसह माणसाचा अपव्यापार झाला आहे. आदिम कातकरी जमात दारिद्र्य, वेठबिगारी, कर्जबाजारीपणा, सतत अन्याय- अत्याचाराने दबलेली आहे. नाशिक, नगर व अन्य जिल्ह्यांमध्ये ठाणे-पालघर येथील अल्पवयीन आदिवासी मुलींची लग्नासाठी विक्रीचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. विविध गावांमध्ये अशाच घटना घडल्याचा संशय आहे, असे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी!
अल्पवयीन कातकरी समाजातील मुलींची पैशांसाठी विक्री होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याला काळिमा फासणारा आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून बालविकास अधिकारी व अन्य सरकारी यंत्रणेला कृतिशील करायला हवे; अन्यथा याविरोधात आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय

Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी

PM Modi Congratulates Trump : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन अन् ट्रेड डीलवरही झाली चर्चा

Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

INDW vs SAW: पोरीनं काय भारी कॅच घेतलाय! भारताच्या क्रांतीने पकडला वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल; पाहा Video

SCROLL FOR NEXT