मुंबई

भिवंडीत नवीन बांधकामासाठी केलेल्या डायनामाइटच्या स्फोटामुळे इमारतीच्या खांबांना आणि भिंतींना तडे

CD

भिवंडीत डायनामाइट स्फोटाने इमारतींना धोका
रहिवाशांची प्रशासनाकडे तक्रार
भिवंडी, ता. १० (बातमीदार) ः अशोकनगर येथील निवासी संकुलाजवळ सुरू असलेल्या नवीन बांधकामासाठी खडक फोडण्यासाठी डायनामाइटचा वापर केल्यामुळे येथील एका सात मजली इमारतीच्या आरसीसी खांबांना आणि भिंतींना तडे गेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे इमारतीमधील रहिवाशांना धोका निर्माण झाला असून, त्यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
शक्ती ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान २७, २८ आणि २९ नोव्हेंबर २०२४ रोजी डायनामाइट ब्लास्टिंग केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. रहिवासी अभिषेक कोठारी यांनी या गंभीर प्रकाराची तक्रार महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे केली आहे. तक्रारीची दखल घेत प्रभाग समिती क्रमांक दोनचे सहाय्यक आयुक्त माणिक जाधव यांनी जागेवर पाहणी केली. त्यांनी ब्लास्टिंगचा वापर झाल्याच्या माहितीला ‘सकाळ’शी बोलताना दुजोरा दिला. महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार पालिका उपायुक्त विक्रम दराडे यांनी शांततानगर पोलिस ठाण्यास पत्र देऊन स्फोटक द्रव्यांचा वापर झाला किंवा कसे, याची तपासणी करण्यास सांगितले आहे. महसूल विभागाकडूनही या घटनेची चौकशी होणार आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून अशोकनगर येथील शक्ती ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या दोन्ही कार्यालयांत जाऊन व्यवस्थापनाशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता तेथे व्यवस्थापक आणि संचालक उपस्थित नसल्याचे व भेट होणार नसल्याचे कार्यालयीन व सेल कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Beed Crime : बीडमध्ये खळबळ! माजी सभापतीच्या मुलाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार; 'या' कारणामुळे घाबरली होती महिला

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

SCROLL FOR NEXT