मुंबई

डॉ. श्रीपाद जोशी यांचा उद्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा

CD

डॉ. श्रीपाद जोशी यांचा उद्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा

मुंबई, ता. ९ ः ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि संपादक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा शनिवारी (ता. ११) नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. व्हीआयपी रोडवरील वनामतीच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात सायंकाळी ५.४५ वाजता होणाऱ्या सोहळ्यात साहित्य क्षेत्रांतील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. जोशी यांची मुलाखत होणार असून त्यांची ग्रंथतुलाही केली जाणार आहे.
माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. गिरीश गांधी सहअध्यक्ष असलेल्या डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अमृतमहोत्सवी सत्कार समितीतर्फे सोहळा होणार आहे. सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे दृकश्राव्य संदेशाद्वारे मनोगत व्यक्त होईल. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषामंत्री उदय सामंत, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत व ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजवादी नेते रघू ठाकूर, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, डॉ. श्रीपाल सबनीस आणि उत्तम कांबळे, ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. वि‌. स. जोग, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा आणि अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित असतील.
मुख्य सत्कार सोहळ्याच्या आधी दुपारी चार वाजता, प्रमोद भुसारी यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेली डॉ. श्रीपाद जोशी यांची प्रकट मुलाखत नाट्यमय अभिरूप न्यायालय स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या सहकार्याने डॉ. जोशी यांची ग्रंथतुला केली जाईल. दुपारी ३.४५ वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल. दुपारी २ ते ३.४५ दरम्यान अनौपचारिक साहित्यिक गप्पा-टप्पा व कविकट्टाही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Chandrakant Patil: विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार पॉकेटमनी: मंत्री चंद्रकांत पाटील; परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात पुढील काळात येणार

छातीत दुखल्यासारखं वाटलं... 'नवरी मिळे हिटलरला' बंद होणार ऐकून सुन्न झालेली वल्लरी, म्हणाली- मी रडतच...

Uddhav Thackeray : छोटा राजनच्या धाकट्या भावाचा ठाकरे सेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश; उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून केले स्वागत

Hardik Pandya: आलिशान गाडीतून आला, तिचा हात पकडणार होताच...; हार्दिक पांड्याचा गर्लफ्रेंडसोबतचा Video Viral

RanjitSingh Deshmukh: मत चोरीबाबत जिल्हा काँग्रेस रस्त्यावर उतरणार: जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख; कऱ्हाडच्या उपोषणास पाठिंबा

SCROLL FOR NEXT