स्वस्थ नारी निरोगी परिवार अभियान यशस्वी
२ लाख ९५ हजार १९८ महिलांसह मुलींची तपासणी
अलिबाग, ता. १२ वार्ताहर ः राज्य शासनाच्या नियोजनातून सेवा समर्पण पंढरवडा, या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात स्वस्थ नारी निरोगी परिवार, हे विशेष आरोग्य अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान यशस्वीपणे पार पडले. हे अभियान जिल्हाअधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनातून यशस्वी झाले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत २ लाख ९५ हजार १९८ महिला व मुलींची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे ८७५६ महिनांचे लसीकरण करण्यात आले. ६४९९ जणांची आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणीही करण्यात आली.
या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तसेच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व शहरी आरोग्य यंत्रणातून महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुख कर्करोग तसेच क्षयरोग या आजाराचे लवकर निदान करण्यावर अभियानाचा भर होता. यामध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलीचे हिमोग्लोबिन तपासणी, गरोदर माता तपासणी, सिकल सेल आजार व रक्तक्षय तपासणी, लसीकरण, दंत तपासणी, छातीची क्ष-किरण तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. या नावीन्यपूर्ण उपक्रमात गरोदर माता तपासणी १०३९५, असंसर्गजन्य आजार तपासणी अंतर्गत मधुमेह तपासणी केलेले ७०, ५३४, रक्तदाब तपासणी ७८, ९५१, कर्करोग स्क्रीनिंग (तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, सिकल सेल आजार तपासणी १३८५० व गर्भाशयमुख कर्करोग ६१, ४६९, क्षयरोग तपासणी २२, २९२, रक्तक्षय तपासणी ३७, ७०७, लसीकरण ८, ७५६, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी ६, ४९९ करण्यात आली. अभियानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य विभागातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविक, अंगणवाडी सेविका व स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त सहभागामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. अनेक महिलांनी या कालावधीत आपली तपासणी करून घेतली व आवश्यक त्या सल्ल्याचा लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.