मुंबई

तरुणाईचा सामाजिक संवाद रंगमंचावर

CD

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प क्र. ४ येथील एसएसटी महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात विभागीय पथनाट्य स्पर्धा पार पडली. यात ठाणे विभागातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयांवर प्रभावी सादरीकरणे करून रंगतदार लढत दिली. वाहतुकीचे नियम पालन, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या संवेदनशील विषयांवर मांडलेली नाटके प्रेक्षकांच्या मनाला भिडली आणि विचार करायला भाग पाडणारी ठरली.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे वाहतूक विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. युवकांमध्ये वाहतुकीचे भान निर्माण करणे आणि सामाजिक जबाबदारीबाबत सजगता वाढवणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. स्पर्धेचे मूल्यमापन परीक्षक डॉ. तुषार वाकसे, प्रा. सुदर्शन पाटील आणि डॉ. हर्षदा दरेकर यांनी केले. एसएसटी महाविद्यालयाने दमदार सादरीकरणातून प्रथम क्रमांक पटकावत पुन्हा एकदा सामाजिक जाणिवेचा ठसा उमटवला. हिरानंदानी फार्मसी महाविद्यालय द्वितीय, तर एस.एच.एम. महाविद्यालय तृतीय क्रमांकावर राहिले. वेदांता महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त किरण बालवडकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ (उल्हासनगर वाहतूक विभाग) आणि वरिष्ठ निरीक्षक अनिल पडवळ (विठ्ठलवाडी वाहतूक विभाग) उपस्थित होते. एनएसएस ठाणे जिल्हा समन्वयक प्रा. जीवन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मयूर माथुर, प्रा. नम्रता सिंग आणि प्रा. स्नेहा गुप्ता यांच्या नेतृत्वात स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
एसएसटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक गवादे, डॉ. संतोष करमानी, एनएसएस विभागीय समन्वयक प्रा. निरज मिश्रा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य देवीदास जळकोटे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी आणि ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागीय पथनाट्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन पार पडले. तरुणाईच्या सर्जनशीलतेतून साकारलेल्या या पथनाट्यांनी वाहतुकीचे भान - सुरक्षित जीवन हा संदेश ठळकपणे अधोरेखित केला, तर समाजात सकारात्मक बदलासाठी युवकांनीही आपला सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT