मुंबई

एक-दाेन मेल्याने काय फरक पडताे?

CD

एक-दाेन मेल्याने काय फरक पडताे?
जैन मुनींचे धर्मसभेत वादग्रस्त वक्तव्‍य; स्वतंत्र पक्षाची घाेषणा

मुंबई, ता. ११ ः ‘कबूतर हा शांतताप्रिय पक्षी आहे. आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचे असेल तरी चालेल. एक-दोन जण मेल्याने काय होते? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही,’ असे वादग्रस्त वक्तव्‍य जैन मुनी कैवल्यरत्न महाराज यांनी केले. या वेळी ‘शांतिदूत जनकल्याण पार्टी’ची घोषणा करून या पक्षाद्वारे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दंड थाेपटले आहेत.

काही दिवसांपासून कोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत. यामुळे जैनधर्मीय तीव्र नाराज झाले असून, त्यांनी सरकारविरोधात नाराजीचा तीव्र सूर आळवला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ११) दादरच्या योगी सभागृहात ‘कबूतर बचाओ धर्मसभा’ आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेच्या निमित्ताने जैन, हिंदू, बौद्ध धर्मगुरू एकाच मंचावर आले. या धर्मसभेत जैन धर्मगुरूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले असून, त्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जैन मुनी कैवल्यरत्न महाराज म्हणाले, की रावणासमोर जटायू पक्षी सामोरा आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्ष्यासाठी श्रीराम यांनी एवढे केले, तर या रामाच्या भूमीमध्ये असे व्हायला नको आहे. मी डॉक्टरांनाही मूर्ख मानतो.
----
...म्हणून फडणवीस मुख्यमंत्री!
आमच्या प्राण्यांवर हल्ला झाला तर आम्ही त्याचे उत्तर देतो; मग शस्त्र उचलावे लागले तरी चालेल. जे सत्तेत आहेत त्यांना साधुसंतांनी बसवले आहे. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्ही साधुसंत रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा स्वरूपानंदजी महाराज यांनी दिला.
----
राजकीय पक्षाच्या स्थापनेची केली घोषणा
‘शांतिदूतांचे प्राण वाचवा, कबुतरखाने खोला. मी येथे कोणत्या पक्षाचा प्रचार करायला आलो नसून शांतिदूतांसाठी आलो आहे. जितके लोक कबुतरामुळे मृत्युमुखी पडले नाहीत, तेवढे दारू आणि नशेमुळे गेले, असे सांगत जैन मुनी नीलेशचंद्र गुरुदेव यांनी, शांतिदूत जनकल्याण पार्टी’ची घोषणा केली. या पक्षाद्वारे मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरणार असून कोण सत्तेवर बसेल, हे आता कबूतरच ठरवतील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात ! म्हशीला वाचवताना ४ वाहनांची धडक; ४ ठार, अनेक जखमी

३७ वर्षांच्या संसारात कधीही अशोक सराफ 'ही' गोष्ट निवेदितांसमोर बोलले नाहीत; म्हणाल्या, 'नंतर त्याला विचारल्यावर...'

CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

Latest Marathi News Live Update : साखर उद्योगावरील चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यात एकत्र

Afghanistan Pakistan Clash : अफगाणिस्तानने घेतला हवाई हल्ल्याचा बदला, पाकिस्तानचे १२ सैनिक ठार; अनेक चौक्यांवर तालिबानचा ताबा

SCROLL FOR NEXT