मुंबई

मोर्चासाठी ठाण्यात वाहतुकीत बदल

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ ः सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या आणि ठाणे महापालिकेतील भष्ट्राचार कारभाराविरोधात शिवसेनेचा ठाकरे गट आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. १३) पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे बंधूंच्या दोन्ही सेनांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता, उद्या दुपारी दोन ते मंगळवारी (ता. १४) पहाटे तीन वाजेदरम्यान ठाणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून करत, मोर्चा मार्गावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात आल्याचे म्हटले आहे.

बंद मार्ग पर्यायी मार्ग
- डॉ. मुस चौकाकडून गडकरी सर्कल डॉ. मुस चौकातून सरळ टॉवर नाका-टेंभी नाकामार्गे पुढे जातील.
- गडकरी सर्कलकडून डॉ. मुस चौक गडकरी सर्कल येथून अल्मेडा चौक चरई कट-खोपट बस सिग्नलमार्गे पुढे
- गोखले रोड सत्यम कलेक्शनमार्गे सगुणा फार्म क्वीनस् कॉर्नरवरून उजवीकडे गोखले उपाहारगृहमार्गे गोखले रोडवर अथवा विष्णूनगर कट नौपाडा पोलिस ठाण्यामार्गे.
- गणपती कारखाना येथून पुरणपोळी गणपती कारखाना येथे उजवे वळण घेत विष्णूनगर कट नौपाडा पोलिस ठाण्यामार्गे
- राजमाता वडापाव सेंटरकडून मढवी हाउस राजमाता वडापाव सेंटर येथून गावदेवी मार्केट कर्वे रोडमार्गे
- विष्णूनगर कटमार्गे गजानन वडापाव विष्णूनगर कट नौपाडा पोलिस ठाण्यामार्गे
- गजानन वडापाव, श्रद्धा वडापावमार्गे गणपती कारखाना येथून आराधना गणपती कारखाना येथून गजानन वडापावमार्गे विष्णूनगर कट नौपाडा पोलिस ठाणे
- हरिनिवास सर्कलमार्गे आराधना हरिनिवास सर्कल घड्याळ चौक तंबी हॉटेल सत्ररज वेफर्स
- घड्याळ चौक डॉमिनोज, तंबी हॉटेलमार्गे टेकडी बंगला तंबी हॉटेल येथूनच घड्याळ चौक येथून उजवे वळण घेत एसबीआय बँक बाजूने सरळ पुढे तीन हात नाकामार्गे
- तंबी हॉटेल, प्रशांत कॉर्नर, तसेच धर्मवीर कट येथून टीएमसी परमार्थ निकेतन येथूनच सत्ररज वेफर्स अथवा धर्मवीर कटमार्ग तीन हात नाका
- अल्मेडा सिग्नल, तसेच टेकडी बंगला रायगड गल्लीमार्गे टीएमसी सर्कल अल्मेडा सिग्नलवरून चरई कट खोपटमार्गे
- नुरीबाबा दर्गा चंदनवाडीमार्गे टीएमसी नुरीबाबा दर्गा-चरई कट खोपट सिग्नलमार्गे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT