मुंबई

खारघरचे पाणी तळोज्याला

CD

खारघरचे पाणी तळोज्याला
सिडकोच्या नियोजनात त्रुटी, रहिवासी हैराण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ ः खारघर वसाहतीतील ४० सेक्टरना दररोज ७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; पण शहराला ७२ एमएमएलडीच पाणीपुरवठा होत असून तळोजा वसाहतीला खारघरचे पाणी दिले जात असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
स्वतःच्या मालकीचे धरण असूनही सिडको अखत्यारीत शहरांना पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. पनवेल महापालिकेत येणाऱ्या खारघरला पाणीपुरवठा करण्याचे काम सिडकोतर्फे केले जाते. सिडकोच्या हेटवणे, एमजेपी आणि नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणातून शहराची तहान भागते. सध्यस्थितीत शहराला ७५ एमएलडी पाण्याची गरज आहे; पण खारघरला सध्या ७२ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे; पण आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस शहराला पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड आहे. व्हॅलिशिल्प, स्वप्नपूर्ती अशा मोठ्या गृहसंकुलांना फटका बसत आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी सिडको तसेच रायगड भवन येथे हंडा मोर्चा काढत महिलावर्गाने अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता; पण पुन्हा तीच परिस्थिती उद्भवत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक प्रकाश सेवतकर यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
--------------------------------------------------
नव्या इमारतींसाठी नियोजन नाही
खारघर शहराची व्याप्ती वाढत आहे. ओवा आणि पेठ गावांपासून ३० ते ३६ सेक्टरपर्यंत शहर विस्तारलेले आहे. या भागात १२ पासून ४२ आणि ५२ मजल्यांपर्यंत उंचीच्या नवीन इमारती आहेत. खारघर सेक्टर ३७, ४० आणि ४२ मध्ये इमारतींची कामे सुरू आहेत. या इमारतीही १४ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत; परंतु नव्या जलवाहिन्या आणि अतिरीक्त पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना सिडकोने तयार केलेली नाही.
--------------------------------------------------
घरांच्या विक्रीची वेळ
सिडकोतर्फे खारघरनंतर तळोजा नोडमध्ये सुमारे २५ हजार घरे तयार केली आहेत. अलीकडच्या काळात १५ हजार विक्रीकरिता उपलब्ध केली होती; मात्र तळोज्यामध्ये तयार केलेल्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक ग्राहकांनी सिडकोच्या तळोजामधील घरांकडे पाठ फिरवली आहे. या भागातील रहिवासी सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठ्याची नामुष्की सिडकोवर आली आहे. दुसरीकडे व्हॅलिशिल्प, स्वप्नपूर्ती सोसायट्यांमध्ये आठवड्यातून चार दिवस पाण्याची बोंब असल्याने अनेकांवर घरांच्या विक्रीची वेळ आली आहे.
------------------------------------------------------
टँकरचे भाव वधारले
खारघर, तळोजा नोडमध्ये आठवड्यातून किमान चार दिवस पाणीपुरवठा होत नाही. शहरातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दर आठवड्याच्या सोमवारी शटडाऊन घेतला जातो. सोमवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होता. त्यानंतर खारघरला सात दिवस पाणी देता येते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले; परंतु आठवड्यातून चार दिवस पाणी येत नसल्याने रहिवाशांवर टँकर मागवावा लागत आहे; पण ४५ हजार लिटरच्या एका टँकरसाठी २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागत असल्याने टँकरविक्रेत्यांकडून वाढीव दराने पाणी विकले जात आहे.
-------------------------------------------
पाण्यातील वाटमारी
खारघर वसाहत - ४० सेक्टर
दैनंदिन पाण्याची गरज - ७५ एमएमएलडी
सद्यःस्थितीतील पुरवठा - ७२ एमएमएलडी
----------------------
तळोजा वसाहत
दैनंदिन पाण्याची गरज - १८ एमएलडी
सिडकोने एमआयडी - ८ एमएलडी
प्रत्यक्षात पुरवठा - ६ एमएलडी
खारघरमधून पुरवठा - १० एमएलडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT