मुंबई

रस्ता रुंदीकरणाच्या कामात राजकीय वाद

CD

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : एमएमआरडीएच्या निधीतून सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान शुक्रवारी संत स्वामी शांतीप्रकाश पुतळ्याजवळ महापालिका अधिकारी रस्ता रुंदीकरण करत असताना अचानक संताप उसळला. माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष भरत गंगोत्री यांनी याविरोधात ठाम भूमिका घेतल्याने घटनास्थळी पालिका प्रभाग अधिकारी आणि गंगोत्री यांच्यात तीव्र वाद झाला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण झाल्याने रस्ता ‘विकासाचा की वादाचा?’ असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होताना दिसला.

उल्हासनगर महापालिकेकडून सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून शहरातील प्रमुख मार्गांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. याच कामाचा एक भाग म्हणून नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प हा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे काँक्रीट केला जात आहे. शुक्रवारी सकाळी या मार्गावर संत स्वामी शांतीप्रकाश पुतळ्याजवळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रोड कटिंगची मार्किंग करत रस्ता रुंदीकरण करण्यास सुरुवात केली. रुंदीकरणात काही घरे आणि दुकाने येत असल्याचे दिसताच स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.

याची माहिती मिळताच भरत गंगोत्री यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधत कारवाईला विरोध दर्शवला. गंगोत्री यांनी नागरिकांच्या घरांवर आणि दुकानांवर कोणतीही पूर्वसूचना न देता मार्किंग करण्याचा निषेध केला. विकासाच्या नावाखाली नागरिकांना त्रास देणे आम्ही सहन करणार नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केली. यावेळी महापालिकेच्या प्रभाग अधिकारी अलका पवार आणि गंगोत्री यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही वेळासाठी परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संवादाचा अभाव
उल्हासनगरमध्ये विकासाच्या नावाखाली अनेक कामे सुरू आहेत; मात्र प्रशासन आणि जनतेतील संवादाचा अभाव वारंवार संघर्ष निर्माण करत आहे. रोड कटिंगसारख्या तांत्रिक कामांपूर्वी नागरिकांशी स्पष्ट संवाद न झाल्यास, अशा वादांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-------------------------------------------------------------

महापालिकेच्या नियोजनानुसार रस्ता रुंदीकरणाची मार्किंग प्रक्रिया करण्यात आली आहे. कोणाच्याही घरावर बेकायदा कारवाई होणार नाही. नागरिकांना योग्य ती सूचना देऊन, मोजणी आणि मोजमापांच्या आधारेच पुढील काम हाती घेतले जाईल. या रस्त्याचे काँक्रीटीकरण हे शहराच्या दीर्घकालीन वाहतूक सुलभतेसाठी अत्यावश्यक आहे, त्यामुळे प्रशासन विकासकामे रोखण्याच्या मनःस्थितीत नाही.
- अलका पवार, प्रभाग अधिकारी
-----

महापालिका अधिकारी नागरिकांच्या घरांच्या आणि दुकानांच्या हद्दीत मार्किंग करत आहेत. लोकांच्या घरांचा, व्यवसायांचा बळी देऊन विकासाचा दिखावा केला जात आहे. आम्ही नागरिकांच्या हितासाठी उभे आहोत आणि अन्यायकारक कारवाईला तीव्र विरोध करू. शहरात रस्त्यांची गरज आहे, पण नियोजन आणि संवादाशिवाय नागरिकांना त्रास देणे योग्य नाही.
- भरत गंगोत्री, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT