मुंबई

झुरमुळ्या आकाशकंदीलाची बाजारात चर्चा

CD

झुरमुळ्या आकाश कंदिलाची बाजारात चर्चा
नवी मुंबईकरांचा पर्यावरणपूरक सण साजरा करण्याकडे कल
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : दिवाळीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. सणानिमित्त एकीकडे उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे पर्यावरणपूरक वस्तूंची छाप बाजारपेठांवर जाणवत असून, झुरमुळ्यांचा आकाश कंदील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
बाजारात यंदा पर्यावरणपूरक आकाश कंदिलांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. दिवाळीची शोभा वाढवणारे वेगवेगळ्या आकारातील आणि आकर्षक रंगातील आकाश कंदील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत. १०० पासून २००० रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. थर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर टाळताना पारंपरिक तसेच पर्यावरणपूरक आकाश कंदील खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आहे. वेगवेगळ्या रंगातील, विविध आकारांच्या कंदिलांना मागणी आहे. त्यात षटकोनी, झुरमुळ्यांचे आकाश कंदील विशेष आकर्षण ठरत आहे. या कंदिलांमध्ये बांबू, कागदाचा वापर होतो. तसेच कागद चिटकविण्यासाठी खळ, पुठ्ठा, कार्डबोर्ड अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जातो.
------------------------
विविध पर्याय उपलब्ध
छोटे-छोटे आकाश कंदील डझनावर मिळत असून, २० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत किंमत आहे. हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. रंगीबेरंगी कापडी, कागदी कंदील, हॅलोजन, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, मेटल स्टार, लोटस, फायरबॉल, विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाश कंदील पाहायला मिळत आहेत. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, बॉल, पॅराशूट असे प्रकार आहेत.
----------------------------
मनमोहक रंगसंगतीवर भर
मायक्रॉनच्या रंगबेरंगी धाग्यापासून सुरेख विणकाम केलेले आकाश कंदील लक्षवेधी ठरत आहेत. बांबूच्या काड्यापासून तयार केलेले आकाश कंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. मातीपासून बनवलेल्या आकाशदिवे, त्यावरील सुंदर नक्षीकाम, मनमोहक रंगसंगती, बहुरंगी एलईडी दिवे व सहजपणे घराबाहेर टांगून ठेवता येईल, अशा पद्धतीचे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT