मुंबई

''गणरंग'' चित्रकला स्पर्धेत मधुरा सोनावणे प्रथम

CD

‘गणरंग’ चित्रकला स्पर्धेत मधुरा सोनावणे प्रथम
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : मैत्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘गणरंग’ या जिल्हास्तरीय शालेय व महाविद्यालयीन चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये कलाप्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, तर यावर्षी ही संख्या वाढून तब्बल दोन हजारांवर पोहोचली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी विठ्ठलवाडी येथील वेदांता महाविद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
वक्त्यांनी या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळतो, असे मत व्यक्त केले आणि ‘गणरंग’ उपक्रम हा कलाप्रेमी तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा असल्याचे नमूद केले. शालेय आणि जिल्हास्तरीय मिळून एकूण १०० हून अधिक विद्यार्थ्यांना पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांमध्ये घेण्यात आली होती. या वेळी उल्हासनगर महापालिकेचे क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी, वेदांता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शिंदे, संकल्प स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य सतीश मेश्राम, तसेच मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणव देसाई, उपाध्यक्ष रूपेश गायकवाड आणि सचिव अतुल उपाध्याय उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते
गट स्तर जिल्हास्तरीय विजेते
गट अ इयत्ता १ ली ते ४ थी (चित्र रंगवणे) प्रथम : अदिती साळुंखे, द्वितीय : प्रत्युशा दुबा, तृतीय : प्रेम दळवी
गट ब इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम : नेहा निवळे, द्वितीय : क्रिशा वायले, तृतीय : अक्षरा पटेल
गट क इयत्ता ८ वी ते १० वी प्रथम : युग शिरसाठ, द्वितीय : राईमा मोनडल, तृतीय : कींजल विश्वकर्मा
गट ड इयत्ता ११ वी ते पदवी स्तर प्रथम : मधुरा सोनावणे, द्वितीय : ऋतुजा गोळे, तृतीय : विशाखा चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT