मुंबई

बल्याणी परिसरात विकासकामांचा धडाका

CD

बल्याणी परिसरात विकासकामांचा धडाका
एक कोटी ६० लाखांचा निधी; नागरिकांना दिवाळीची भेट
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग्रामीण ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील बल्याणी प्रभागात माजी नगरसेवक मयूर पाटील आणि माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. दिवाळीच्या तोंडावर बल्याणी परिसरामध्ये एक कोटी ६० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभागातील नागरिकांना मूलभूत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मयूर पाटील व नमिता पाटील हे प्रशासनाकडे नेहमीच पाठपुरावा करीत असतात. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऐन सणासुदीच्या काळात तब्बल एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपलब्ध करण्यात आला.

रविवारी माजी नगरसेवक मयूर पाटील आणि नमिता पाटील यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आला. बल्याणी उंभार्णी बौद्धवाडा येथे अंतर्गत गटार व पायवाट, बल्याणी आदिवासी पाडा येथे सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्ता, गटार व पायवाट, बल्याणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील गटार व पायवाट या कामांचा समावेश आहे.

मयूर पाटील यांनी सांगितले, की ग्रामीण आणि अविकसित प्रभागांचा कायापालट करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. त्यांनी ही कामे म्हणजे बल्याणीतील नागरिकांना दिलेली दिवाळीची भेट असल्याचे नमूद केले. हा एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होण्यासाठी माजी नगरसेविका नमिता पाटील आणि आमदार विश्वनाथ भोईर यांचा पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला, असे त्यांनी सांगितले. समाजातील सर्वच घटकांच्या सोयी-सुविधांसाठी काम करणे आणि प्रशासनाकडून भांडून निधी आणणे हे आपले कर्तव्य असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी माजी नगरसेवक मयूर पाटील, नमिता पाटील यांच्यासह राजू पाटील, कृष्ण दळवी, आरफत गुजर, महेश पाटील, अनंता पाटील, एकनाथ पवार, हेमंत गायकवाड, संदीप गायकवाड, शिवाजी गोंधळे, सूरज पावशे यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला आघाडी, युवा सैनिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT