मुंबई

लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांसह उघड्या डीपी बॉक्स चा धोका;

CD

वीज वितरण व्यवस्थेचा बोजवारा
लोंबकळत्या केबल्स, उघड्या डीपी बॉक्समुळे नागरिकांमध्ये भीती

तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : शहरातील गावठाण, झोपडपट्टी आणि सिडको नोड परिसरात वीज वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी उघड्या डीपी बॉक्समधून वीजतारा बाहेर आल्या आहेत, तर विद्युत खांबांवरून केबल्स लोंबकळत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गावठाण व झोपडपट्टी भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी, त्या केबल्स लोंबकळताना दिसत आहेत. काही ठिकाणी या केबल्स गटारातून जात असल्याने सफाई कामगारांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झोपडपट्टी भागात जी प्लस २ व ३ बांधकामे झाल्याने वीजतारा अगदी घराच्या गॅलरीजजवळून जात असून, चुकून स्पर्श झाल्यास शॉक लागण्याची भीती आहे. काही ठिकाणी उघड्या डीपी बॉक्समुळे आधीही अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा ठिकाणी तत्काळ उपाययोजना करून सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी वीज महावितरण अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सबस्टेशनला कचराकुंडीचे स्वरूप
शहरात महावितरणच्या सबस्टेशनला अनेक ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. काही ठिकाणी गर्दुल्ले बसून नशा करताना दिसतात. काही ठिकाणी डीपी बॉक्सचे दरवाजेच गायब झालेले असून, वीजवाहिन्या जमिनीवर लोंबळकत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

महावितरणकडून वेळोवेळी उघड्या डीपी बॉक्सची दुरुस्ती केली जाते. याशिवाय कुठेही धोकादायक डीपी बॉक्स असेल, तर त्याची तक्रार करा, ते तत्काळ दुरुस्त करण्यात येतील. तसेच, लोंबकळणाऱ्या केबल्स भूमिगत केल्या आहेत.
- दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, वाशी, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT