मुंबई

प्लास्टिक कारखाना आगीत जळून राख

CD

आसनगाव औद्योगिक वसाहतीत अग्नितांडव
प्लॅस्टिक कारखाना राख

शहापूर, ता. १३ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील आसनगाव औद्योगिक वसाहतीतील एसकेआय नावाच्या कारखान्यात सोमवारी (ता. १३) सकाळच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण कारखाना खाक झाला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आसनगाव औद्योगिक वसाहतीतील एसकेआय हा प्लॅस्टिकच्या विविध उपकरणांचे उत्पादन करणारा कारखाना असून, कारखान्यात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा साठा असल्याने आग क्षणार्धात पसरली आणि काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच शहापूर नगरपंचायत, भिवंडी आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता एवढी मोठी होती, की आकाशात उठलेले धुराचे मोठे लोट दूरपर्यंत दिसत होते. ही आग इतस्ततः पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राधान्याने प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; मात्र तीव्रतेमुळे ते प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT