मुंबई

कर्जत यार्डचा कायापालट : आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग प्रणाली सुरू

CD

कर्जत रेल्वे यार्डचा कायापालट
आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग प्रणाली सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर रेल्वेच्या आधुनिकीकरणातील मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. कर्जत यार्ड रिमॉडेलिंग आणि आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) प्रणाली रविवारी (ता. १२) सायंकाळी ६.३० वाजता यशस्वीपणे सुरू करण्यात आली. तब्बल ७४.५३ कोटींच्या खर्चाने पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे रेल्वेचे संचालन अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह होणार आहे.

कर्जत हे घाट विभाग आणि उपनगरी मार्गाचा केंद्र बिंदू असल्याने येथे गाड्यांची मोठी हालचाल होते. त्यामुळे येथील जुन्या प्रणालीला आधुनिक ‘आरआरआय’ तंत्रज्ञानाने बदलण्यात आले आहे. यामुळे ट्रेन नियंत्रण संगणकीकृत झाले असून, मानवी हस्तक्षेपात घट झाली आहे. कर्जत ते पळसधरीदरम्यान चौथी नवीन लाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे खोपोली शाखेच्या गाड्या घाट विभागाच्या मुख्य मार्गापासून वेगळ्या झाल्या आहेत. रेल्वेगाड्यांची वेळबद्धता आणि उपनगरी गाड्यांचे संचालन सुधारल्‍याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. अप आणि डाउन मार्गांवरील रिसेप्शन लाइन वाढवण्यात आल्या असून, लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्यांना सिग्नलवर घेणे आणि रेल्वे गाड्यांचे संचालन सुलभ झाले आहे. प्रत्येक गाडीमागे सरासरी १० मिनिटांची बचत झाली. नवीन लाइन आणि विस्तारित ट्रॅकमुळे यार्डची क्षमता २५ टक्क्यांनी वाढली असून, पनवेलकडून येणाऱ्या मालगाड्या मुख्य मार्ग क्रॉस न करता थेट यार्डमध्ये घेतल्या जातात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

 रिअल टाइम मॉनिटरिंग शक्य
नवीन आरआरआय प्रणालीत ४६ मुख्य सिग्नल, ३९ शंट सिग्नल बसवले आहेत. दुहेरी सिग्नल डिटेक्शन प्रणाली (एमएसडीएसी आणि एएफटीसी)मुळे सुरक्षेत वाढ झाली आहे. तसेच कर्जत-भिवपुरीदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सुरू झाले असून, ‘एफॉर्निक्स डेटा लॉगर’ प्रणालीद्वारे सिग्नल हालचालीचे रिअल टाइम मॉनिटरिंग शक्य झाले आहे.

घाट विभागात अधिक सुरक्षित
कर्जत यार्डाच्या रूट रिले इंटरलॉकिंग या प्रकल्पात आठ पुलांचा आणि दोन फूट ओव्हर पुलाचा विस्तार, ४.९ किलोमीटर नवीन ट्रॅक लिंकिंग, नऊ टीकेएम ओएचई वायरिंग, ३५० नवे खांब आणि २० नवीन टर्नआउट बसवले गेले. या कामांमुळे घाट विभागातील रेल्वे संचालन अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT